विशेष प्रतिनिधी
लंडन – ब्रिटनमध्ये युवकांनी लवकरात लवकर लस घ्यावी यासाठी त्यांना शॉपिंग व्हाऊचर, स्वस्तात पिझ्झा, टॅक्सी भाड्यात सवलत आणि इतर अनेक सवलती देण्याचा खुद्द सरकारचाच विचार आहे.UK government to provide shopping vouchers, cheap pizza, taxi fares
ब्रिटनमध्ये आतापर्यंत ८८.५० टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला असून ७२ टक्के जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या १८ ते २९ या वयोगटातील युवकांच्या लसीकरणावर सरकारचा भर असून या गटातीलही ६७ टक्के जणांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे.
उरलेल्या नागरिकांचेही लसीकरण वेगाने करण्यासाठी सरकार विविध योजना राबविण्याचा विचार करत आहे. यानुसार, लसीकरण केंद्रापर्यंत मोफत प्रवास, लसीकरण घेतलेल्यांना पिझ्झा आणि इतर अन्नपदार्थांवर सवलत अशा स्वरूपात ही सवलत असेल. उबर, बोल्ट, डिलिव्हरू आणि पिझ्झा पिलग्रीम्स या कंपन्या सरकारी योजनेत सहभागी होणार असून आणखी काही कंपन्यांशी बोलणी सुरु आहे.
लसीकरण केंद्रावर घेतलेल्या सेल्फीचा पुरावा दाखवून नागरीकांना सवलतींचा लाभ घेता येऊ शकतो. केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, लसीकरण मोहिमेमुळे २३ जुलैपर्यंत देशात सुमारे ६० हजार जणांचा मृत्यू टाळता आला असून सव्वा दोन कोटी लोकांचा संभाव्य संसर्गापासून बचाव झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App