विशेष प्रतिनिधी
वेस्ट बँक : पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये दोन इस्रायली हेर पकडले गेले आहेत. ते येथील निर्वासित छावणीत राहत होते. शनिवारी लोकांनी त्यांना ओळखले आणि जमावाने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.Two Israeli spies caught in West Bank Palestinians gave them a horrific death
यानंतर त्यांचे मृतदेह रस्त्यावर ओढून नेण्यात आले आणि त्यानंतर रक्ताने माखलेले मृतदेह लाथ मारून विजेच्या खांबाला लटकवण्यात आले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
एका स्थानिक गटाने दोन पॅलेस्टिनींवर इस्त्रायली सुरक्षा दलांना 6 नोव्हेंबर रोजी तुलकरेम निर्वासित छावणीवर हल्ला करण्यास मदत केल्याचा आरोप केला. पॅलेस्टिनी सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, निर्वासित छावणीवर केलेल्या हल्ल्यात स्थानिक गटाचे तीन प्रमुख नेते मारले गेले.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, मृतांची नावे 31 वर्षीय हमजा मुबारक आणि 29 वर्षीय आझम जुआब्रा अशी आहेत. ते कथितरित्या इस्रायलला वेस्ट बँकमधील गटाच्या कारवायांची माहिती देत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App