वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : Trump’s ७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझात हमासच्या हल्ल्याला १६ महिन्यांहून जास्त काळ लोटला आहे. आता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी चर्चा करताना हमासला अल्टिमेटम दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, सर्व इस्रायली नागरिकांची शनिवारी दुपारपर्यंत सुटका न झाल्यास इस्रायल-हमास युद्धबंदी संपुष्टात आणली जाईल. ओलिसांना थोड्या-थोड्या संख्येत नव्हे तर सर्वांना एकसाथ सोडले पाहिजे.Trump’s
आम्हाला सर्व ओलिसांची परती हवी आहे. तसे न झाल्यास मी नरकाचे दरवाजे उघडे करेन. हमासने त्यांची मागणी मान्य केल्यास तुम्ही काय पाऊल उचलणार या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, तुम्हाला माहीत होईल. हमासलाही कळेल, मला काय म्हणायचे आहे.
हमासचा वरिष्ठ अधिकारी समी अबू जुहरी म्हणाला, ट्रम्पनी लक्षात ठेवावे की, कराराचा दोन्ही पक्षांनी आदर केला पाहिजे आणि कैद्यांना परत आणण्याचा ती एकमेव पद्धती आहे. त्यांनी सांगितले की, धमक्यांमुळे प्रकरणे आणखी गुंतागुंतीची होतात.
गाझावासीयांना न स्वीकारल्यास इजिप्त, जॉर्डन पैशापैशाला महाग
ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केले की, जॉर्डन आणि इजिप्तने गाझातून बाहेर पडलेल्या पॅलेस्टिनी निर्वासितांना न स्वीकारल्यास त्या देशांना दिली जाणारी अमेरिकी मदत रोखली जाईल. ट्रम्प म्हणाले, ते जॉर्डन आणि इजिप्तला एका-एका पैशासाठी लाचार करू. इजिप्त आणि जाॅर्डन दोघांनी ट्रम्पच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. सुरक्षा चिंतांमुळे कैरोने पॅलेस्टिनींचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. इजिप्तच्या म्हणण्यानुसार, हमासचे अतिरेकी इजिप्तमधून इस्रायलवर निशाणा साधू शकतात. यामुळे इस्रायलकडून प्रत्युत्तराच्या कारवाईचा धोका राहील किंवा सिनाईत स्थानिक बंड उफाळू शकते. तज्ज्ञांनुसार, जॉर्डनमध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या पॅलेस्टिनी आहे. तेथे स्थानिक व पॅलेस्टिनीत तणाव आहे.
इस्रायली सैनिकांच्या सुट्या रद्द, गाझातप्रत्येक स्थितीसाठी तत्पर राहण्याचे आदेश
हमास, इस्रायल आणि अरब देशांच्या अधिकाऱ्यांनी याआधीच इशारा दिला होता की, युद्धबंदी रद्द होण्याच्या वळणावर आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे ही शक्यता आणखी वाढली की, अमेरिका हा करार पुढे नेण्याच्या बाजूने नाही. इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यावर चर्चेसाठी बैठक बोलावली आहे. हमाससोबत युद्धबंदी संकट आणि ट्रम्पच्या धमकीदरम्यान इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इस्रायली लष्कराला(आयडीएफ) अलर्टवर राहणे आणि गाझात कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायली लष्कराने गाझा विभागातील सैनिकांच्या सर्व सुट्या रद्द केल्या आहेत. यातून इस्रायल नव्याने युद्ध सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळतात.
झेलेन्स्की सौदेबाजी करू शकत नाहीत, युक्रेन कधीही रशिया होऊ शकतो: अमेरिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना इशारा दिली आहे की, ‘ते सौदेबाजी करू शकत नाहीत, ते कधीही रशियन होऊ शकतात.’ ट्रम्प युद्ध लवकर संपवण्यावर जोर देत आहेत. झेलेन्स्की रशियासोबत कोणत्याही करारांतर्गत अमेरिकेकडून कडक सुरक्षा हमी मागत आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, ते लवकरच त्यांचा विशेष दूत कीथ केलॉग यांना युक्रेनला पाठवणार आहेत. त्यांना लढाई थांबवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सोपवले आहे. १४ फेब्रुवारीला म्युनिच सुरक्षा परिषदेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स आणि झेलेन्स्की यांची भेट होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App