इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अरौरी यास ठार मारण्याची दिली होती धमकी
विशेष प्रतिनिधी
लेबनॉन : इस्रायलने केलेल्या ड्रोन हल्ल्यात हमासचा प्रमुख कमांडर सालेह अल अरौरी मारला गेला आहे. अरौरी हा हमासच्या लष्करी शाखेच्या संस्थापकांपैकी एक मानला जात होता आणि त्याने पश्चिम भागातील गटाचे नेतृत्व केले होते. मात्र, या कथित हल्ल्याबाबत इस्रायलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सालेह अल अरौरी हा देखील अनेक वर्षांपासून इस्रायलमध्ये वॉण्टेड होता.Top Hamas commander Saleh Al Arouri killed in drone attack reward was Rs 40 crore
लेबनॉनच्या हिजबुल्लाह गटाच्या टेलिव्हिजन स्टेशनचे म्हणणे आहे की सालेह अल अरौरी मंगळवारी दक्षिण बेरूत उपनगरात झालेल्या स्फोटात ठार झाला. इस्रायल-हमास युद्ध सुरू होण्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अरौरी यास ठार मारण्याची धमकी दिली होती. अरोरी सध्या लेबनॉनमध्ये राहत होता.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या अहवालानुसार, गुप्तचर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की अल-अरौरीने हमासला जून 2014 मध्ये तीन इस्रायली युवकांचे अपहरण आणि हत्या तसेच इतर अनेक हल्ल्यांची योजना आखण्यात मदत केली होती.
अल अरौरीवर ४० कोटींहून अधिक रुपयांचे बक्षीस असल्याचे सांगण्यात येत आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्याची अरौरीला आधीच माहिती होती, असे मानले जाते. बेरूत येथे पॅलेस्टिनी गटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जात असताना अरौरी यास लक्ष्य करण्यात आले. त्याच्या कारवर ड्रोनने हल्ला केला आणि त्याचा मृत्यू झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App