पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या ह्या भारतीय महिलेला 40 वर्षांनी भारतात राहणाऱ्या आपल्या कुटुंबियांचा ठावठिकाणा सापडला, चित्रपट कथेला साजेशी सत्यता

विशेष प्रतिनिधी

कराची : एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी या रिअल लाइफ मुन्नीची कथा आहे. बजरंगी भाईजान हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. या चित्रपटामध्ये सलमान खान एका पाकिस्तानी मुलीला तिच्या घरी परत सुखरूप पोहोचवतो.

This Indian woman living in Pakistan has found the whereabouts of her family after 40 years

गदर या चित्रपटामध्ये फाळणीच्या वेळी पाकिस्तानमधील एक युवती जेव्हा चुकून भारतात येते. तेव्हा भारतातील दारासिंग तिला वाचवतो, तिच्यासोबत विवाह करतो आणि तिला आसरा देतो, सुरक्षितता देतो. हे आपन चित्रपटामध्ये पाहिले आहे.

पण खऱ्या आयुष्यामध्ये देखील असे काही होऊ शकते असे तुम्हाला वाटते का? पण असे झाले आहे.

उत्तर प्रदेशमधील एका खेडेगावातून ह्या स्त्रीला 1981 साली तिच्या काकांनी विकण्यासाठी म्हणून दिल्लीला घेऊन गेले होते. दिल्लीतून तिला पुन्हा हरियाणाला पाठवण्यात आले. हरयाणातून पुढे तिला पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आले होते. पाकिस्तानमध्ये तिचे नशीब चांगले म्हणून सज्जाद नावाच्या एका व्यक्तीने तिला वाचवले आणि तिच्यासोबत लग्नही केले.


Earthquake In Pakistan : रिश्टर स्केलवर 6.0 तीव्रतेच्या भूकंपाने हादरला पाकिस्तान, 20 जण ठार, 300 हून अधिक जखमी


लग्नानंतर तिला 4 मुले झाली आहेत. आता ती वयाच्या पन्नाशीमध्ये आहे. आणि तिला भारतातील आपल्या घरच्यांना भेटण्याची ओढ लागली होती. पण तिच्याकडे त्यांची काही खास माहिती न्हवती कारण जेव्हा ती पाकिस्तान मध्ये आली होती तेव्हा ती लहान होती.

त्यामुळे तिने इंटरनेटवर एक व्हिडिओ बनवून शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या गावाचे वर्णन आणि आपल्या नातेवाईकांबद्दल देखील माहिती दिली होती. भारतात हा व्हिडिओ त्यांच्या समाजाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर देखील शेअर करण्यात आला होता. एका लोकल जर्नलिस्टने या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर या स्त्रीच्या भावाने हा व्हिडिओ पाहिला आणि त्याने तिला ओळखले.

याबद्दल माहिती देताना तो म्हणतो की, सुरुवातीला मी माझ्या बहिणीला ओळखू शकलो नाही. पण ज्या पध्दतीने तिने आपल्या नातेवाईकांचे आणि आमच्या गावाचे वर्णन केले, त्यावर मी तिला लगेच ओळखले की ही माझी मोठी बहीण आहे.

पाकिस्तानमध्ये सज्जाद या व्यक्तीने दिलेल्या आसऱ्यानंतर तिने आपले नाव बदलून बुशरा असे ठेवले होते. आता तिची फॅमिली तिला जवळपास 40 वर्षांनंतर भेटली आहे. त्यामुळे ती अतिशय आनंदात आहे. आणि लवकरच आपल्या घरच्या भेटण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे.

This Indian woman living in Pakistan has found the whereabouts of her family after 40 years

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात