विशेष प्रतिनिधी
ढाका: एका प्रसिद्ध अभिनेत्रीला बलात्काराची धमकी दिल्याप्रकरणी केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. फोनवर बोलताना या केंद्रीय मंत्र्याने अभिनेत्रीला बलात्काराची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्यात आले आहे.The Union Minister who threatened to rape the actress had to resign
बांग्लादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांन आपले पद गमवावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी बांग्लादेशमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कलाकार माहिया माही यांना बलात्काराची धमकी दिली होती. हे प्रकरण मुराद यांना चांगलंच महागात पडले आहे.
बांग्लादेशमधील अभिनेत्री माहिया माही यांना काही दिवसांपूर्वी मुराद हसन यांनी काही दिवसांपूर्वी फोन केला होता. यावेळी काही मुद्द्यांवरून दोघांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर चिडलेल्या मुराद हसन यांनी फोन कट केला. यावेळी अभिनेत्री माही यांच्यासोबत एक अभिनेतादेखील उपस्थित होता.
त्यानंतर काही वेळातच हसन यांनी पुन्हा एकदा माहींना फोन केला आणि रागाच्या भरात बोलायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला विरोध करणाऱ्या माही यांना बलात्कार करण्याची धमकी मुराद यांनी दिली. या प्रकाराने संतापलेल्या अभिनेत्री माही यांनी या प्रकाराची तक्रार दाखल करत मोबाईलवरील संभाषणाची क्लिप पोलिसांना दिली.
पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरही टीका होऊ लागल्यावर सरकारची प्रतिमा टिकविण्यासाठी त्यांनी मुराद हसन यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुराद यांनी राजीनामा दिला आहे.आपल्याविरुद्ध षडयंत्र रचलं जात असून क्लिपमधील आवाज आपला नसल्याचा दावा मुराद यांनी केला आहे. यापूर्वी बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा यांच्या नातीवर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. यामुळे बांग्लादेश सरकारची चांगलीच नाचक्की होत होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App