फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेला सुनावले, फ्रान्स अमेरिकेची जहागिरी नाही, चीनच्या तैवानवरील वन चायना धोरणाचेही केले समर्थन

वृत्तसंस्था

पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रोन बुधवारी नेदरलँडस दौऱ्यावर होते. यादरम्यान ते म्हणाले की, चीन दौऱ्यादरम्यान केलेल्या विधानावर ते कायम आहेत. अमेरिकेचा मित्र असणे म्हणजे त्यांचे अंकित असणे नाही, फ्रान्स ही अमेरिकेची जहागिरी नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही स्वतःविषयी विचार करू शकत नाही, असे मॅक्रोन म्हणाले होते.The French President told the US that France is not a vassal of the US, and also supported China’s One China policy on Taiwan.

फ्रेंच राष्ट्रपती पुढे म्हणाले – तैवानमध्ये यथास्थितीविषयी फ्रान्सचे पूर्ण समर्थन आहे. आम्ही चीनच्या वन चायना पॉलिसीसोबत आहोत आणि समस्येवर शांतीपूर्ण पद्धतीने तोडगा काढायला हवा. मॅक्रोन यांच्या विधानावर व्हाइट हाऊसने प्रतिक्रिया दिली होती की, फ्रान्ससोबतच्या आमच्या द्विपक्षीय संबंधांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे.



मॅक्रोन म्हणाले – युरोपने अमेरिकेवर अवलंबून असू नये

मॅक्रोन 5 एप्रिल रोजी 3 दिवसीय चीन दौऱ्यासाठी बीजिंगमध्ये दाखल झाले होते. येथे त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. यादरम्यान दोन्ही देशांत व्यापार व आर्थिक सहकार्यासह तैवान मुद्द्यावरही चर्चा झाली होती. बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना फ्रान्सने म्हटले होते की युरोपने अमेरिकेवरील आपले अवलंबित्व कमी करायला हवे. तैवानवरून चीन व अमेरिकेतील तणावात स्वतः ओढले जाण्यापासून आम्ही वाचायला हवे.

युरोप नेहमी त्या भांडणांत फसतो जिथे त्याने नसायला हवे

पॉलिटिकोला दिलेल्या एका वक्तव्यात फ्रेंच राष्ट्रपती म्हणाले की – युरोप नेहमी त्या भांडणांत फसतो जी भांडणे त्यांची नसतात. यामुळेही आम्ही कधीही आपले धोरणात्मक हित पाहून निर्णय घेऊ शकत नाही. युरोपातील नेत्यांनी हा विचार करायला हवा की तैवानविषयीचा वाद आणखी वाढवणे आपल्या हिताचे नाही. आम्ही युक्रेनमधील समस्येवर तोडगा काढू शकत नाही. अशात आम्ही तैवानला कोणत्या आधारे म्हणू शकू की जर काही चुकीचे झाले तर आम्ही तुमच्यासाठी हजर असू. ही केवळ तणाव वाढवण्याची पद्धत आहे.

युक्रेनने म्हटले – फ्रान्सला आपल्या सिद्धांतांचा विसर पडला आहे

दुसरीकडे मॅक्रोन यांच्या विधानावर तैवानच्या संसदेचे सभापती यू सी-कुन म्हणाले की- फ्रान्सला आपले 3 मुलभूत सिद्धांत सार्वभौमत्व, समानता आणि बंधूभावाचा विसर पडला आहे का? घटनेचा भाग असूनही याकडे दूर्लक्ष करणे योग्य आहे का? लोकशाही देश दुसऱ्या देशातील लोकांचे जीवन आणि मृत्यूकडे दूर्लक्ष करू शकतात का? तज्ज्ञांनुसार मॅक्रोन यांनी त्यांच्या विधानातून तैवानमधील स्थितीसाठी चीन आणि अमेरिका दोघांनाही जबाबदार धरले आहे. त्यामुळे भविष्यात चीनविषयी कठोर भूमिका घेणे ईयूसाठी कठीण ठरू शकेल.

3 दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होतो मॅक्रोन

मॅक्रोन यांनी यापूर्वी रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरही शी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यांनी म्हटले होते की एक वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय शांततेला नुकसान पोहोचत आहे. मला विश्वास आहे की, जिनपिंग रशियासोबत चर्चा करून सर्वांना चर्चेसाठी एकत्र आणू शकतात. सध्या चीन आणि फ्रान्सचे संबंध सकारात्मक आणि स्थिर आहेत. दोन्ही देशांत मतभेद आणि निर्बंध पार करून सोबत येण्याची क्षमता आहे.

The French President told the US that France is not a vassal of the US, and also supported China’s One China policy on Taiwan.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात