जगभरात हिंदू द्वेषात दसपटीने वाढ!; पाकिस्तान, इराण मधून रचले जातेय कारस्थान!; अमेरिकेतूनही खतपाणी!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात सगळे पुरोगामी इस्लामोफोबियाची हाकाटी पिटत असताना जगभरात विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये हिंदू द्वेष दुप्पट – चौपट नव्हे, तर तब्बल दसपटीने वाढल्याचा धक्कादायक खुलासा अमेरिकेच्या नेटवर्क कॉन्टेजियन्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या NCRI रिपोर्ट मध्ये केला आहे. Tenfold Increase in Hindu Hatred Worldwide!; Conspiracy is being created from Pakistan, Iran

15 सप्टेंबर 2022 ला कॅनडातील स्वामीनारायण मंदिरात काही लोकांनी घुसून तोडफोड केली. भिंतींवर भारत विरोधी नारे लिहिले. त्याआधी 19 सप्टेंबर रोजी ब्रिटन मधल्या लिस्टर शहरात शिव मंदिरात घुसून काही लोकांनी भगवे झेंडे उपसून काढले आणि मंदिरात तोडफोड केली. या घटनांमुळे जगभरातल्या हिंदू द्वेषाकडे भारतीयांचे आणि जगाचे लक्ष गेलेले दिसत आहे. पण हिंदू द्वेषाचे हे कारस्थान अधिक जुने आणि अधिक खोलवर आहे. किंबहुना या कारस्थानाची पाळेमुळे इराण आणि पाकिस्तान सारख्या इस्लामी कट्टरवादी देशांमध्ये आहेत.

गेल्या तीन वर्षांचा अभ्यास केला असता, ही बाब लक्षात आली आहे, की हिंदू विरुद्ध हिंसा आणि द्वेष याच्या घटनांमध्ये दसपटीने वाढ झाली आहे. 3 वर्षांपूर्वी वर्षभरात साधारण 10 ठिकाणी हिंदू विरुद्ध हिंसाचार व्हायचा. पण आता हेच प्रमाण 100 पर्यंत जाऊन पोहोचले आहे.

अमेरिकेतील नेटवर्क कॉन्टेजियन रिसर्च इन्स्टिट्यूटने अर्थात NCRI यासंबंधीचा अभ्यास करून रिपोर्ट तयार केला आहे. सोशल मीडियावर यहुदींविरोधात जी मीम्स शेअर केली जातात, तशीच मीम्स हिंदू विरोधात शेअर केल्यानंतर त्याचा अभ्यास जुलै 2022 मध्ये संबंधित इन्स्टिट्यूटने केला आहे. याचे निष्कर्ष वॉशिंग्टन डीसी मध्ये NCRI इन्स्टिट्यूटचे सह संस्थापक जोएल फिंकेलस्टीन यांनी 21 सप्टेंबर 2022 रोजी एका कार्यक्रमात शेअर केले. अमेरिकी काँग्रेसमन हाँक जॉन्सनने हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

या कार्यक्रमात जोएल फिंकेलस्टीन यांनी स्पष्ट केले की, 3 वर्षात हिंदूं विरुद्ध द्वेषाच्या हिंसक घटना 1000% वाढल्या आहेत. सोशल मीडियात यहुदींशी मिळते जुळते हिंदू विरोधी मिम्स शेअर केले जात आहेत. जगभरातील अनेक इस्लामिक कट्टरवादी देश या कारस्थानात सामील आहेत त्यामुळेच अमेरिकेसह युरोप आणि अन्य देशांमध्ये हिंदू विरोधी नफरत द्वेष आणि हिंसाचाराला बळ मिळते आहे.

NCRI ने 4 सोशल मीडिया प्लेटफॉर्म आणि तीन पद्धतीने या सर्व बाबींचे अनालिसिस केले आहे. त्यानंतरच वास्तववादी रिपोर्ट तयार केला आहे. हिंदू विरुद्ध सर्वाधिक नफरत आणि द्वेष पसरवणाऱ्या चार सोशल मीडिया साइट्स प्लॅटफॉर्म शोधून काढले आहेत.

Twitter : 23.8 कोटी युजर्स, Telegram Messenger : 70 कोटी युजर्स, 4Chan : अमेरिका आणि युरोपमध्ये 1825 वयोगटातील युवकांमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी इमेजबोर्ड वेबसाइट, ज्याचे 2.2 कोटी यूजर्स आहेत. यातून इमेज आणि मिम्स तयार करून ती शेअर केली जातात, Gab : ही एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ज्याचे युजर्स 40 लाख पेक्षा अधिक आहेत.

अर्थात वर उल्लेख केलेल्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मधून सर्वच युजर्स हिंदू द्वेष पसरवतात अशी वस्तुस्थिती नसल्याचे देखील रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे.

 • NCRI ने रिसर्च साठी तीन पद्धती अवलंबल्या जानेवारी 2019 ते जानेवारी 2022 पर्यंत हिंदूंच्या विरुद्ध द्वेष आणि नफरत वाढवणाऱ्या पोस्टचे कीवर्ड आणि हॅशटॅग शोधून काढले. त्यांची ओळख व्यवस्थित पटवून घेतली.
 • हे कीवर्ड आणि हॅशटॅग वापरून केले जात असलेल्या पोस्ट तपासल्या. सोशल मीडिया पोस्टचा बिहेवियरल पॅटर्न आणि त्याचा प्रभाव याचे अनालिसिस केले.
 • या अनालिसिस मधून हिंदू विरोधी द्वेष आणि नफरत वाढण्याची तीन कारणे समोर आली.
 • पहिले कारण अर्थातच भारतात होत असलेल्या सांप्रदायिक घटनांवरच्या प्रतिक्रिया.
 • 24 फेब्रुवारी 2020 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत आले आणि दिल्लीत धार्मिक दंगे सुरू झाले. त्याचवेळी सोशल मीडियावर #delhigenocide, #muslimgenocide असे कीवर्ड आणि हैशटैग ट्रेंड केले गेले.
 • दुसरे कारण भारतात होत असलेले राजकीय फैसले.
 • जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविले गेले त्याचवेळी #kashmirdeniesindia सारखे कीबोर्ड आणि हॅशटॅग परदेशात बसलेल्या विशिष्ट लोकांनी सोशल मीडियावर ट्रेंड केले.
 • तिसरे कारण म्हणजे जगभरात होत असलेल्या घटनांचे प्रतिबिंब आणि पडसाद. 2018 मध्ये इराणचे अध्यक्ष हसन रुहानी हे भारत दौऱ्यावर आले होते. त्याचवेळी इराण मधील ट्रॉलर्सनी ‘human rights violations in Jammu and Kashmir’ असे ट्विट 1053 वेळा केले.
 • हिंदूंविरुद्ध फेक पोस्ट
 • याखेरीस हिंदू विरोधी नफरत आणि द्वेष फैलावण्यासाठी काही विशिष्ट कीवर्ड आणि हॅशटॅग यांचा कायम वापर झालेला दिसतो आहे. #hindunazi, #pajeet, #indiaout, #freekashmir हे हॅशटॅग आणि कीबोर्ड त्यातले प्रमुख होते.
 • इतकेच नाही तर जेव्हा NCRI ने ट्विटर वर या हॅशटॅगची आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे पडताळणी केली तेव्हा आणखी एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे 3 वर्षांमध्ये 10 लाखांहून जास्त हिंदू विरोधी ट्विट फक्त इराण मधल्या ट्रॉलर्सनी केलेली आढळली.
 • या सोशल मीडिया पोस्टमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसा भडकवण्याची चिथावणी तर होतीच, पण त्याचबरोबर हिंदू देवता प्रतीके हिंदू संस्कृती राहणीमान यांना विशेषत्वाने टार्गेट केल्याचे दिसते. या ट्विट बरोबरच हिंदू विरुद्ध भडकावणारे अनेक फोटो 26 11 मुंबई हल्ल्यासारख्या घटना त्यांचे फोटो शेअर केल्याचे आढळले आहे.
 • हिंदू समाजाचा अपमान करण्यासाठी ‘Pajeet’ शब्द वापरला गेला आहे. या शब्दाचा वापर 250 % पेक्षा जास्त वेळा सोशल मीडियावर झाला आहे. त्यासाठी इंग्रजीतले अन्य शब्दही वापरले गेले आहेत, ते म्हणजे Streetshitter, Poojeet, Dishonest, hindu are dirty…!!
 • या शब्दांचा वापर 2020 मध्ये सोशल मीडियावर प्रचंड वाढला हिंदू आणि भारतीयांची प्रतिमा जगात मलिन करण्यासाठी हे शब्द वापरले गेले.
 • NCRI रिपोर्टनुसार दोन तऱ्हेचे लोक हिंदू विरोधी द्वेषभावना पसरवण्यासाठी पोस्ट तयार करून जास्तीत जास्त फॉरवर्ड करत असतात.
 • पहिले व्हाइट सुपरमेसिस्ट पाश्चात्य देशांमध्ये वर्णद्वेषी गोरे लोक आणि दुसरे म्हणजे
 • इस्लामी कट्टरपंथी : इराण आणि पाकिस्तान मधून मधल्या 44 शहरांमधून सर्वाधिक हिंदू द्वेषी पोस्ट फैलावल्या गेल्या आहेत.
 • त्यातही पाकिस्तानातील लाहोर कराची सियालकोट आणि रावळपिंडी या शहरांमधून सर्वाधिक हिंदुद्वेषी आणि भारत द्वेषी पोस्ट केल्याचे आढळल्या आहेत. या पोस्ट गुजरात दिल्ली आणि मुंबईमध्ये जोरदार फैलावल्या होत्या.
 • 8 जुलै 2016 रोजी हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी सैन्य कारवाईत मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर #kashmirdeniesindia हा हॅशटॅग पाकिस्तान आणि इराण मधून जोरदार ट्रेंड केला गेला. इराणी ट्रेलर्सच्या मते भारत मुळातच हिंदू राष्ट्र आहे त्यामुळेच हिंदू द्वेष फैलावणे हे त्यांना “कर्तव्य” वाटते.
 • सात मार्च 2017 रोजी मध्य प्रदेशातील शाजापुर मध्ये भोपाळ उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये 9 लोक गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये ISIS दहशतवादी संघटनेचा हात होता. परंतु, त्याचवेळी पाकिस्तानातून मात्र, #HinduExtremists हा हॅशटॅग ट्रेंड केला गेला जणू काही हा बॉम्बस्फोट हिंदू कट्टर पंथीयांनी घडवल्याची अफवा पसरवली गेली.
 • NCRI ने केलेल्या आणखी अनालिसिस मधून फक्त इराण आणि पाकिस्तान मधूनच अशा पद्धतीचा हिंदू द्वेष फैलावला जातो असा नाही तर अमेरिका, भारत, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर हिंदु द्वेष फैलावल्याचे पुरावे आढळले आहेत.
 • 4Chan वर हिंदू विरूद्ध Pajeet शब्दाचा वापर पश्चिमी देशात सर्वाधिक अमेरिकेत झाला होता. टॉप 5 मध्ये दुसरा खुद्द भारत आहे, रिसर्च मध्ये आढळलेल्या 30 हजार Pajeet शब्दातल्या कमेंट मध्ये 12 हजार शब्द तर फक्त अमेरिकेत वापरले गेले होते.
 • 1980 आणि 1987 मध्ये अमेरिकेत “डॉट बस्टर” नावाची एक मोहीम चालवली होती. तिचा उद्देशही हिंदुद्वेष असाच होता, तर 1987 मध्ये जर्सी या नियतकालिका एक लेख प्रकाशित झाला होता. त्यामध्ये तर उघडपणे हिंदूंवर हल्ला करण्याची चिथावणी देण्यात आली होती.
 • सध्या हिंदू विरोधात अमेरिकेत तीन पद्धतीने द्वेष फैलावला जातो आहे.
 • हिंदूंच्या गाड्यांच्या आणि घरांच्या काचा फोडून हिंदू घरांमध्ये होत असलेले सण – समारंभ आणि पार्ट्यांवर हल्ले करून आणि बाकीच्या समाजांना हिंदू समाजापासून दूर करण्याचे प्रयत्न करणे याद्वारे हिंदू द्वेष फैलावला जातो आहे.

Tenfold Increase in Hindu Hatred Worldwide!; Conspiracy is being created from Pakistan, Iran

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात