कुंडूझ, हेरत, गझनी, कंदाहार ही शहरे तर तालिबानच्या ताब्यात गेली, काबूल पडण्यापूर्वी तालिबानशी समझोता करण्याची धडपड
वृत्तसंस्था
काबूल : कुंडूझ, हेरत, गझनी, कंदहार अशी एकापाठोपाठ एक महत्त्वाची शहरे तालिबान ताब्यात घेत असताना दुसरीकडे कतारमध्ये मात्र पाच देशांचे प्रतिनिधी अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, या चर्चेत सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर तालिबानने काबूल जवळच्या घोर प्रांतावरही कब्जा केला आहे. काबूल सोडून जवळजवळ सर्व अफगाणिस्थान आज तालिबान्यांच्या कब्जात आले आहे. Taliban captured ghor province, demands president Ashraf Ghani’s resignation
अफगाणिस्तानात अध्यक्ष अशरफ घनी हे देशाला संबोधित करून काही महत्त्वपूर्ण घोषणा करू शकतात. परंतु त्याआधीच तालिबान आणि पाकिस्तान यांनी अशरफ घनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या सरकारबरोबर कोणताही समझोता करायला तालिबानने आता नकार दिला आहे.
तत्पूर्वी, गेल्या 48 तासांच्या आत तालिबानने आपले आक्रमण वाढवून गझनी, हेरत आणि कंदाहार ही महत्वाची शहरे ताब्यात घेतली. नंतर त्यांनी घोर प्रांत कब्जात घेतला. आपल्या जुन्याच पद्धतीने या शहरांमध्ये अंमल बसविण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्याच वेळी काबूलमधल्या राजवटीने तालिबानला सत्ता वाटपाची ऑफर दिली आहे. ही ऑफर तालिबानने अद्याप धुडकावून त्याला अनुकूल प्रतिसाद दिला नाही. उलट त्यांनी अध्यक्ष अशरफ घनी यांचा राजीनामा मागितला आहे.
दरम्यान कतारची राजधानी दोहामध्ये अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया, भारत आणि पाकिस्तान या देशांचे प्रतिनिधी अफगाणिस्तान मधील पेचप्रसंगावर आणि संघर्ष यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करताहेत. तालिबानच्या प्रतिनिधींचाही यात सहभाग आहे. नाटो फौजा मागे घेतल्यानंतर तालिबानची आक्रमकता वाढून अफगाणिस्तान आतली काबुल वगळता सर्व शहरे तालिबानच्या ताब्यात येत आहेत. त्यातली वर उल्लेख केलेली शहरे ताब्यात आल्यानंतर त्यांनी अधिकृत घोषणा न करता तेथे शरीयत कायदा लागू केला आहे. शैक्षणिक संस्थांपासून महिलांशी संबंधित इतर संस्था बंद पाडण्यात आल्या आहेत. पुरुष आणि महिलांची सार्वजनिक ठिकाणी वर्तणुकीची नियमावली लागू करण्यात आली आहे.
अशा स्थितीत अमेरिका-रशिया अफगाणिस्तान भारत आणि पाकिस्तान यांचे प्रतिनिधी अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये काबुलवर देखील तालिबानचा कब्जा होऊ शकतो, असा रिपोर्ट अमेरिकन परराष्ट्र मंत्रालय पेंटॅगॉन कडे आलेला आहे. काबूल तालिबानच्या ताब्यात जाण्यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रक्रियेने वेग घ्यावा आणि अफगाणिस्तानच्या सरकारी फौजा तालिबान यांच्यात सत्ता वाटपाचे सत्ता वाटपाचा तोडगा निघावा असे प्रयत्न या पाच देशांचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App