Mission Olympics; पदक विजेत्या सिंधू, लवलिना, नीरजचा पुढाकार; सरकारचा पाठिंबा; छोट्या गावांमधून “बडे” खेळाडू तयार करणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंनी टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये पदक कमाईची अभूतपूर्व कामगिरी केल्यानंतर या खेळाडूंनी भविष्यातले खेळाडू घडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारच्या “Tops”/टॉप्स पॉलिसीचे हे खेळाडू लाभार्थी आहेतच,Mission Olympics; Medal winners Sindhu, Lovelina, Neeraj’s initiative; Government support; Will create “big” players from small villages

पण त्याचबरोबर त्याच्या पुढच्या टप्प्यात या खेळाडूंनी पुढाकार घेऊन आपापले खेळ भारतीय युवकांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी आणि भारतीय खेळाडूंना निवडून त्यांना up to date training देण्यासाठी स्पोर्ट्स अकॅडमी, कॉम्प्लेक्स सुरू करण्याचे ठरवले आहे.



सुपरस्टार ऑलिम्पियन बँडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आता विशाखापट्टणममध्ये बॅडमिंटन अकॅडमी सुरू करणार असून भारतीय युवकांना येथे सर्वोत्तम training facilities उपलब्ध करून देणार आहे. आंध्र सरकारची यासाठी तिला मदत होणार आहे.

अशाच प्रकारचा पुढाकार लवलिना बोर्गहेन हिने आसाम सरकारच्या पुढाकारातून घेतला असून आसाम मधले तिचे मूळगाव गोलाघाट येथे बॉक्सिंग अकॅडमी तसेच तिच्या नावाचे स्टेडियम सुरू करण्यात येणार आहे. आसाम सरकारचा संपूर्ण आर्थिक पाठिंबा तिला यासाठी मिळणार आहे.

मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी तिच्या भव्य सत्कार समारंभात ही घोषणा केली. त्याच वेळी तिने हा प्रस्ताव स्वीकारला. आसामच्या दुर्गम भागातून जे खेळाडू निवडले जातील त्यांना गोलघाट मधल्या ट्रेनिंग सेंटर मध्ये बॉक्सिंगचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येईल.

अशाच प्रकारची ऑफर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी भालाफेक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला दिली आहे . सरकारी नोकरी बरोबरच पंचफुलामध्ये होणाऱ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे संचालकपद त्याला ऑफर करण्यात आले आहे.

तेथे ॲथलेटिक्ससाठी सर्व प्रकारच्या ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा उभारण्यात येणार असून तेथेही निवड प्रक्रियेद्वारे निवडून हरियाणातील छोट्या गावातील उत्तम खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग देण्यात येईल. नीरज चोप्रा यासाठी त्याची सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देईल.

विशाखापट्टणम, गोलाघाट आणि पंचकुला या तिन्ही ठिकाणी ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा उभ्या करून पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये तिथे सिंधू, लवलिना तसेच नीरज यांच्यासारख्या उत्तमातल्या उत्तम खेळाडूंची निपज व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन प्रयत्न करणार आहेत. ऑलिंपिक दर्जाचे वरिष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक तेथे नेमण्यात येणार आहेत.या प्रशिक्षण केंद्रांमध्ये पैसा कुठेही कमी पडू दिला जाणार नाही. त्याचबरोबर अनावश्यक सरकारी हस्तक्षेपही होणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

Mission Olympics; Medal winners Sindhu, Lovelina, Neeraj’s initiative; Government support; Will create “big” players from small villages

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात