विशेष प्रतिनिधी
काबूल : तालिबानने आईएसच्या एका ठिकाणावर हल्ला करून तो नष्ट केला आहे. या हल्ल्यात बरेच आईएस आतंकी मारले गेले आहेत. रविवारी एका मशिदीच्या प्रवेशद्वारावर होऊन ५ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता.
Taliban attack hideout after bombing outside a mosque in kabul
तालिबानच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, काबूलमधील तालिबानी सुरक्षा सैनिकांनी इस्लामिक स्टेटचे एक ठिकाण नष्ट केले आहे. सोमवारी याबाबत बोलताना तो म्हणाला की, काबूलमधील एका मशिदी बाहेर जो स्फोट झाला होता त्या स्फोटानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हा हल्ला झाला होता आणि त्यात ५ जणांचा मृत्यू झाला होता.
Kabul Mosque Blast : काबुलमधील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट, अनेक नागरिक ठार
काडी सईद कोस्ती यांनी या मृत्युंबद्दल खात्री केली आहे. तालिबानच्या अधिकृत प्रवक्त्याने (बिलाल करीमी) ने सांगितले की, ३ संशयितांना अटक करण्यात आले आहे. उत्तरी काबूलमधील खैर खाना जवळ इस्लामिक स्टेटचे हे केंद्र होते. या कारवाईमध्ये किती आईएस आतंकी मारले गेले किंवा तालिबान पैकी कुणी जखमी झाले आहे का याबाबत कुणी खुलासा केलेला नाही. तालिबानचे प्रवक्ता जबी उल्लाह मुजाहिद यांच्या आईच्या स्मृतीसाठी काबूल मधील इदगाही मशिदीमध्ये प्रार्थना आयोजित केली होती. या मशिदीला टार्गेट करून हा स्फोट केला होता. ट्विटरवर मुजाहिदने लिहिले आहे की ह्या हल्ल्यात नागरिकांची हत्या झाली आहे. तालिबानी सैनिकांना काही नुकसान झाले नाही असे तालिबान प्रवक्ता म्हणतो. मशिदीच्या बाहेर उभे असलेले सामान्य नागरिक यात मारले गेले. या हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांची नेमकी संख्या सांगितलेली नाही आणि याबाबत पुढील तपास चालू आहे असे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App