तैवानच्या काऊशुंग शहरातील 13 मजली इमारतीत गुरुवारी भीषण आग लागली. यामुळे 46 जणांचा मृत्यू झाला आणि 79 जण होरपळले. अग्निशमन विभागाने सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. Taiwan Overnight Fire Building Southern City Kaohsiung Many Killing Injuring Dozens
प्रतिनिधी
नवी दिल्ली : तैवानच्या काऊशुंग शहरातील 13 मजली इमारतीत गुरुवारी भीषण आग लागली. यामुळे 46 जणांचा मृत्यू झाला आणि 79 जण होरपळले. अग्निशमन विभागाने सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग खूप भीषण होती आणि आगीत इमारतीचे अनेक मजले जळून खाक झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग पहाटे 3च्या सुमारास लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, त्यांनी पहाटे 3 वाजता स्फोटाचा आवाज ऐकला होता.
अधिकाऱ्यांनी यापूर्वी इशारा दिला होता की, लोक इमारतीच्या निवासी भागात सातव्या ते अकराव्या मजल्यांमध्ये अडकलेले असू शकतात. मात्र, आता इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे. या अग्निकांडाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. व्हिडिओमध्ये, इमारतीच्या खालच्या मजल्यावरून ज्वाला आणि धूर निघताना दिसतो. त्याचवेळी अग्निशमन दलाचे जवानही रस्त्यावरून इमारतीवर पाणी शिंपडताना दिसत आहेत.
Taiwan Overnight Fire Building Southern City Kaohsiung Many Killing Injuring Dozens
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App