विशेष प्रतिनिधी
मॉस्को: रशियाच्या नौदलाने एका परमाणु पाणबुडीच्या मदतीने जिरकॉन हाइपरसोनिक क्रूज मिसाइलचे यशस्वी परीक्षण केले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे परीक्षण बैरंट समुद्रातून केले गेले. परीक्षण चालू असताना या मिसाईलचे ध्येय निश्चित केले गेले. रशियाने एका परमाणू पाणबुडीच्या मदतीने पहिल्यांदाच अशा प्रकारचे मिसाईल परीक्षण केले असल्याचे सांगितले जात आहे.
Successful test fire of Russia’s Hypersonic Tsirkon (Zircon) Missile
परमाणु पाणबुडी सेवेरोडविंस्क मधून या हाइपर्सोनिक क्रूस मिसाईलने बैरंट समुद्रातून आपले लक्ष साधले. या नव्या पिढीच्या जिरकॉन हाइपरसोनिक मिसाइलचे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी कौतुक केले आहे.
उत्तर कोरियाने नवीन हायपरसोनिक क्षेपणास्त्र केले लाँच
रशियन मंत्रालयाने या परिक्षणाचा एक व्हिडीओही प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये असे दिसते की ही मिसाईल रात्रीच्या अंधारात समुद्रातून आकाशाकडे वेगाने उड्डाण करीत आहे. या एंटी शिप क्रूज मिसाइलचे यशस्वी परीक्षण झाल्यानंतर लवकरच तिला सक्रीय करण्यात येईल. अशा प्रकारचे हाइपरसोनिक मिसाईल अमेरिकेकडे सुद्धा नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App