‘स्पेसएक्स’च्या स्टारशिप रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट; काही मिनिटांतच कोसळले

स्टारशिपची ही पहिली परिभ्रमण चाचणी होती

विशेष प्रतिनिधी

टेक्सास : जगातील आघाडीच्या अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटने गुरुवारी पहिले चाचणी उड्डाण केले. मात्र, प्रक्षेपणानंतर लगेचच त्याचा स्फोट झाला. जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटने बोका चिका, टेक्सास येथून संध्याकाळी ७ वाजता उड्डाण केले होते. स्टारशिप कॅप्सूल उड्डाणाच्या पहिल्या टप्प्यात तीन मिनिटांत रॉकेट बूस्टरपासून वेगळे होणार होते, परंतु वेगळे झाले नाही आणि रॉकेटचा स्फोट झाला. SpaceX’s Starship rocket explodes above Gulf of Mexico

स्टारशिपची ही पहिली परिभ्रमण चाचणी होती. यापूर्वी १७ एप्रिललाही ते सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. यानंतर प्रेशर व्हॉल्व्ह फ्रीज झाल्याने ते थांबवावे लागले होते. कंपनीचे संस्थापक एलोन मस्क यांनी प्रेक्षणापूर्वी सांगितले होते की हे चाचणी उड्डाण यशस्वी होण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतील.

या संदर्भात स्पेसएक्सने सांगितले की, आज आपण खूप काही शिकलो आहोत. यामुळे आम्हाला पुढे यश मिळेल. आजची चाचणी आम्हाला स्टारशिपची विश्वासार्हता सुधारण्यास मदत करेल. कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी संघाचे अभिनंदन केले.

स्टारशिप रॉकेट म्हणजे काय?

SpaceX चे स्टारशिप स्पेसक्राफ्ट आणि सुपर हेवी रॉकेट यांना एकत्रितपणे स्टारशिप असे नाव देण्यात आले आहे. स्टारशिप हे एक पुन्हा वापरता येण्याजोगे अंतराळयान आहे जे पृथ्वीच्या कक्षेत, चंद्र, मंगळ आणि त्यापलीकडे क्रू आणि कार्गो दोन्ही वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे जगातील आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण असणार आहे.

SpaceXs Starship rocket explodes above Gulf of Mexico

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात