वर्णद्वेषाचा निषेध व्यक्त करण्यास विरोध केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर क्विंटन डिकॉक याने माफी मागितली आहे. त्यामुळे अखेर दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.South African wicketkeeper Quinton Decock’s apology finally declared non-racist
विशेष प्रतिनिधी
शारजाह : वर्णद्वेषाचा निषेध व्यक्त करण्यास विरोध केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर क्विंटन डिकॉक याने माफी मागितली आहे. त्यामुळे अखेर दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.
टी २० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात कर्णधार क्विंटन डिकॉकने स्वत:ला संघातून वगळले होते. त्याचा आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वर्णभेद विरोध करण्याच्या पद्धतीवरून वाद झाला होता. तो गुडघे टेकून वर्णभेदाचा विरोध करण्यास तयार नव्हता. या विषयावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर क्विंटन डिकॉकने माफी मागितली होती. या माफीनाम्यानंतर दक्षिण आफ्रिका श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरली.
त्यावेळी क्विंटन डिकॉक देखील अंतिम अकरात होता. त्याला क्लासेनच्या जागी संघात स्थान दिले होते. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण संघाने सामना सुरु होण्यापूर्वी गुडघे टेकून वर्णभेदाविरुद्ध आपला निषेध नोंदवला. यावेळी क्विंटन डिकॉकनेही गुडघे टेकून निषेध दर्शवला. हा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला.
क्विंटन डिकॉक आपल्या माफीनाम्यात म्हणाला की, गैरसमजातून मला वर्णद्वेषी ठरवण्यात आल्याने मला वेदना झाल्या आहे. याचा माझ्या कुटुंबावर, माझ्या गर्भवती पत्नीवर परिणाम झाला आहे. मी वर्णद्वेषी नाही. माझ्या मनालाच हे ठाऊक आहे आणि मला वाटते की जे मला ओळखतात त्यांना देखील हे माहित आहे. ट्विटरच्या माध्यमातून माफीनामा सादर करणारा डिकॉक म्हणाला , वेस्ट इंडीज विरुद्ध न खेळून मला कोणाचाही अनादर करायचा नव्हता. विशेष करून वेस्ट इंडीज संघाचा तर नाहीच. काही लोकांना हे समजणार नाही की हे सगळे आम्ही सामन्यासाठी निघताना घडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App