चेक रिपब्लिक विद्यापीठात शूटआऊट; 10 विद्यार्थी ठार, 30 जखमी, 13 गंभीर; हल्लेखोरही मारला गेला

वृत्तसंस्था

प्राग : चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री गोळीबार झाला. सीएनएनच्या वृत्तानुसार- 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 30 जण जखमी असून त्यापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. Shootout at Czech Republic University; 10 students killed, 30 injured, 13 seriously; The attacker was also killed

त्याच बरोबर हल्लेखोर देखील ठार झाल्याचे वृत्त आहे. आपत्कालीन सेवांकडून या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फुटेजमध्ये विद्यार्थी गोळीबारातून पळताना दिसत आहेत.

हल्लेखोराची ओळख उघड झालेली नाही

सीएनएनने विद्यापीठाच्या हवाल्याने म्हटले आहे की, पोलिसांनी हल्लेखोराला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. या गोळीबारात त्याला काही गोळ्या लागल्या. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
गोळीबाराच्या वेळी काही विद्यार्थ्यांनी स्वत:ला वर्गात कोंडून घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थी इमारतीच्या गॅलरीमध्ये लपले होते. त्यात काही घाईगडबडीत पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. चार्ल्स विद्यापीठाच्या फिलॉसॉफी कॅम्पसमध्ये ही घटना घडली. पर्यटकही येथे वारंवार येत असतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार हा कॉलेजचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर विद्यार्थी नाताळच्या सुट्टीत जाणार होते. सध्या या इमारतीला पोलिसांनी वेढा घातला आहे. गोळीबार करणारा हा एकटा नसल्याचं समजतं. त्याच्यासोबत आणखी काही लोक असू शकतात.

एका वृत्तानुसार, या घटनेचे कारण विद्यार्थ्यांमधील परस्पर वैर होते. युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी शोक व्यक्त केला आहे. डिसेंबर 2019 मध्येही येथे गोळीबार झाला होता. तत्कालीन 42 वर्षीय व्यक्तीने 6 जणांची हत्या केली होती. हॉस्पिटलच्या वेटिंग रूममधील ही घटना आहे. 2015 मध्ये रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला होता.

Shootout at Czech Republic University; 10 students killed, 30 injured, 13 seriously; The attacker was also killed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात