Shiekh Hasina: हिंसाचाराच्या आगडोंबातल्या बांगलादेशावर लष्कराचा ताबा; पंतप्रधान शेख हसीना भारताच्या आश्रयाला!!


वृत्तसंस्था

ढाका : बांगलादेशमध्ये मोठा राजकीय राडा झाला आहे. हिंसाचाराच्या आगडोंबात होरफळलेला बांगलादेश सोडून पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल झाल्या आहेत.  बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. बांगलादेशमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे.  Shiekh Hasina resigns as Bangladesh PM

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.  बांगलादेशमधील अस्थिर परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय.  मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सुरू आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या ताब्यात गेली आहे.

शेख हसीना यांचे हेलिकॉप्टर भारतातील त्रिपुरा येथील आगरतळा विमातळावर लँड

बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव आणि हिंसाचार सुरु आहे. देशाातील लोकांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली आहे.  20 लाख लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करत असल्याच्या घोषणेनंतर बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले.

शेख हसीना यांनी हेलिकॉप्टरमधून देश सोडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  शेख हसीना यांचे हेलिकॉप्टर भारतातील त्रिपुरा येथील आगरतळा विमातळावर लँड झाले आहे. अशा स्थितीत भारत आपल्या मित्र राष्ट्राच्या विश्वासू नेत्याला आश्रय देणार आहे का??, असा प्रश्न उपस्थित केला जात होत आहे.

Shiekh Hasina resigns as Bangladesh PM

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात