वृत्तसंस्था
लंडन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीसंबंधी गेल्या अनेक महिन्यांपासून अंदाज वर्तवले जात आहेत. त्यातच आता पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची बातमी पाश्चात्य माध्यमांनी दिली आहे. Russian President Putin has a heart attack
ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर पुतिन बेडरुममध्ये खाली जमिनीवर कोसळले होते. सुरक्षा अधिकाऱ्याने त्यांना जमिनीवर बेशुद्धावस्थेत पाहिल्यानंतर ही माहिती समोर आली असा दावा बातमीत केला आहे. हे टेलीग्राम चॅनेल नेहमीच पुतिन यांच्या प्रकृतीसंबंधी वृत्त देत असतं. रशियामधील निवृत्त गुप्तचर अधिकारी आणि क्रेमिलनमधील अधिकाऱ्यांकडून आपण ही माहिती मिळवतो असा त्यांचा दावा आहे.
टेलीग्राम ग्रुपचं ही बातमी ब्रिटनमधील न्यूज आउटलेट्स द मिरर, जीबी न्यूज आणि द एक्सप्रेसनेही प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुतिन रविवारी रात्री 9 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास बेडरुममधील जमिनीवर जेवणाच्या बाजूला खाली पडलेले होते. जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खाली जमिनीवर काहीतरी पडल्याचा आवाज ऐकला तेव्हा ते धावत आले असता हा प्रकार उघडकीस आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App