रशियन सैन्याचे काळजाचा थरकाप उडवणारे क्रौर्य ;२५ युक्रेनियन महिलांना ओलिस ठेवून बलात्कार, त्यापैकी ९ आता प्रेग्नंट; १६ वर्षांच्या शाळकरी मुलीलाही सोडले नाही


रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी देश सोडला आहे. रशियन सैनिकांच्या क्रूरतेचे अनेक पुरावे समोर येत आहेत. आता अशी माहिती समोर आली आहे की, बुचा शहरात झालेल्या हत्याकांडानंतर रशियन सैनिकांनी तेथील एका गावाच्या तळघरात 25 महिला आणि मुलींना ओलीस ठेवले आहे. दिवसातून अनेकवेळा त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. रशियन सैनिकांच्या क्रूरतेमुळे 16 वर्षांच्या शाळकरी मुलीसह एकूण 9 महिला गर्भवती झाल्या आहेत. या शाळकरी मुलीने ब्रिटीश वृत्तपत्र डेली मेलशी संवाद साधत या भीषण घटनेचा तपशील सांगितला आहे.Russia Ukrain War Updates 25 Ukrainian women held hostage and raped, 9 of them now pregnant Says Reports


वृत्तसंस्था

कीव्ह : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी देश सोडला आहे. रशियन सैनिकांच्या क्रूरतेचे अनेक पुरावे समोर येत आहेत. आता अशी माहिती समोर आली आहे की, बुचा शहरात झालेल्या हत्याकांडानंतर रशियन सैनिकांनी तेथील एका गावाच्या तळघरात 25 महिला आणि मुलींना ओलीस ठेवले आहे. दिवसातून अनेकवेळा त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. रशियन सैनिकांच्या क्रूरतेमुळे 16 वर्षांच्या शाळकरी मुलीसह एकूण 9 महिला गर्भवती झाल्या आहेत. या शाळकरी मुलीने ब्रिटीश वृत्तपत्र डेली मेलशी संवाद साधत या भीषण घटनेचा तपशील सांगितला आहे.

बंदुकीच्या जोरावर बलात्कार

या शाळकरी मुलीच्या म्हणण्यानुसार, रशियन सैनिक तिच्या घरात घुसले आणि बंदुकीच्या जोरावर तिच्यावर जबरदस्ती केली. तिचा जीव वाचवण्यासाठी ती कुटुंबासह निवारागृहात होती. ही मुलगी सांगते की रशियन सैनिकांनी 25 मुलींना एका तळघरात ओलिस ठेवले आहे. त्यांचे वय 14 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे. दररोज अनेक सैनिक त्यांच्यावर बलात्कार करतात आणि 9 मुली गर्भवती झाल्या आहेत. हा प्रकार 13 मार्चपासून सुरू आहे. १६ वर्षीय शाळकरी मुलगी म्हणते – रशियन सैनिकांनी आधी दारू प्यायली. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केला.



वृद्ध महिलांनाही सोडले नाही

पीडित मुलगी म्हणाली- आमच्या क्रास्वनिका गावात 78 वर्षीय महिलेवरही बलात्कार झाला. आमचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही प्रसारमाध्यमांना रशियन सैनिक कसे महिलांवर अत्याचार करतात हे सांगितले आहे. याप्रकरणी एका रशियन सैनिकालाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत शेकडो महिलांना रशियन सैनिकांनी वासनेची शिकार बनवले आहे.

बीबीसीशी संवाद साधताना बूचा येथील एका महिलेने सांगितले- माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीवर रस्त्यावर बलात्कार झाला. UN मध्ये युक्रेनच्या प्रतिनिधीनेही अनेक घटनांचे पुरावे दिले आहेत. एका 11 वर्षाच्या मुलासमोर त्याच्या आईवर लैंगिक अत्याचार झाला. असाच प्रकार एका 14 वर्षांच्या मुलीसोबत घडला. आतापर्यंत 1 लाख 20 हजार मुलांचे अपहरण झाल्याचा आरोप होत आहे.

महिलेला तिच्या पतीसमोरच फरपटत नेले

कीव्हपासून 45 किमी अंतरावर राहणाऱ्या एका महिलेने सांगितले – 7 मार्च रोजी एक सैनिक आमच्या घरात घुसला. त्याने मला माझ्या पतीसमोर बंदुकीच्या जोरावर उचलले आणि जवळच्या घरात नेले. तेथे बलात्कार केला. ती घरी परतली तेव्हा तिच्या पतीचा मृतदेह आढळून आला. आरोपी रशियन सैनिकाने गावातील इतर अनेक महिलांवरही बलात्कार केला. घरातील मौल्यवान वस्तूही लुटून नेल्या. एका महिलेवर तीन वेळा अत्याचार झाला. नंतर गळा चिरून तिची हत्याही करण्यात आली.

रशियन सरकार युद्ध सुरू झाल्यापासून दावा करत आहे की त्यांच्या सैनिकांनी कोणत्याही नागरिकाला लक्ष्य केले नाही. दुसरीकडे, यूएनसह अनेक संस्थांनी हा दावा फेटाळला असताना, पुतीन सरकारने या संघटनांवरच बंदी घातली आहे.

Russia Ukrain War Updates 25 Ukrainian women held hostage and raped, 9 of them now pregnant Says Reports

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात