तालिबानकडून सुशिक्षित मुलींचा घरोघरी शोध; अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप, बलात्कार आणि हत्येची धमकी

Reports Taliban Are Looking For Educated Girls From House To House; threatning to Rape And Kill

Taliban : अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान पूर्णपणे सोडले आहे आणि आता काबूल विमानतळासह संपूर्ण राजधानी तालिबानच्या ताब्यात गेली आहे. गेल्या 20 वर्षांत अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आपल्या शिक्षण पद्धतीद्वारे नवीन पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. या हेतूसाठी अमेरिकन विद्यापीठ राजधानी काबुलमध्ये स्थापन करण्यात आले, यात पाश्चात्य शिक्षण दिले जात होते. Reports Taliban Are Looking For Educated Girls From House To House; threatning to Rape And Kill


वृत्तसंस्था

काबूल : अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान पूर्णपणे सोडले आहे आणि आता काबूल विमानतळासह संपूर्ण राजधानी तालिबानच्या ताब्यात गेली आहे. गेल्या 20 वर्षांत अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आपल्या शिक्षण पद्धतीद्वारे नवीन पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. या हेतूसाठी अमेरिकन विद्यापीठ राजधानी काबुलमध्ये स्थापन करण्यात आले, यात पाश्चात्य शिक्षण दिले जात होते.

अफगाणिस्तानातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये या विद्यापीठाची क्रेझ होती, पण आता अमेरिकेने देश सोडल्यानंतर या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आणि विशेषतः मुलींना धोका जाणवत आहे. बीबीसीच्या पत्रकाराने एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, तालिबानने अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या महिला विद्यार्थिनींवर बलात्कार करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.

बीबीसीच्या पत्रकाराने लिहिले, ‘काबुलमधील अमेरिकन विद्यापीठातील विद्यार्थी म्हणतात की, तालिबानला त्यांची नावे आणि घरचे पत्ते माहिती आहेत. एका विद्यार्थ्याला हा मेसेज आला आहे, ज्यात लिहिले आहे – तुम्ही अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता आणि सरकारसाठी काम करत होता. जरा थांबा, आम्ही तुमच्याकडे पाहून घेऊ.’ दुसर्‍या संदेशात या मुलीला सांगण्यात आले आहे – आम्ही तुझ्यावर बलात्कार करू आणि तुला ठार मारू.

अनेक मुली घरात लपलेल्या, प्रत्येक क्षणी तालिबानची भीती

काबूल आणि अफगाणिस्तानच्या इतर भागात मुली आपल्या घरांमध्ये लपून राहत आहेत. त्या खूप घाबरल्या आहेत. अमेरिकन सैन्य काबूलमधून परतल्यानंतर मुलींना धोका वाढला आहे. हजारो अफगाण मुलींनी पाश्चात्य देशांमध्ये आश्रय मागितला, पण सर्वांनाच मदत मिळाली नाही. आता हे सर्व लपलेले आहेत आणि खूप घाबरले आहेत.

शरियतच्या नियमानुसार महिलांना अधिकार

महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल आणि कोणालाही लक्ष्य केले जाणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे. तालिबानने असेही म्हटले आहे की, महिलांना त्यांचे अधिकार शरियतनुसार दिले जातील. काही शाळांचे फोटोदेखील तालिबान समर्थकांनी व्हायरल केले आहेत, ज्यात मुली शाळेत जात आहेत आणि महिला बाजारात फिरत आहेत. मात्र, हे फोटो कधी घेतलेले आहेत, याची खातरजमा झालेली नाही.

Reports Taliban Are Looking For Educated Girls From House To House; threatning to Rape And Kill

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात