वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा एकाच दिवशी कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचा विक्रम झाला आहे. मंगळवारी एकाच दिवसात १.३० कोटी लोकांना लसीचा डोस दिला आहे. भारतात आता कोरोना लसीचे ६५ कोटीहून जास्त डोस देण्यात आले असून देशातील ५० टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. हिमाचल प्रदेशने १०० टक्के लोकांना लसीचा पहिला डोस दिला असून असं करणारे ते पहिलेच राज्य ठरले आहे. Nation celebrates Super August! India made a new vaccination record with 1.30 crore doses on August 31.
ऑगस्ट महिन्यात एकूण १८.१९ कोटी डोस देण्यात आले आहेत. एकाच महिन्यात कोरोनाच्या इतक्या मोठ्या प्रमाणात डोस देणारा भारत हा एकमेव देश आहे. तर २१ ते २७ ऑगस्ट या दरम्यान, एकाच आठवड्यात देशात एकूण ४.६६ कोटी लसी देण्यात आल्याचा हा एक विक्रमच आहे.
कोरोना लसीकरणाचा मंगळवारी २८८ वा दिवस होता. काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशात कोरोना लसीचे १.४ कोटी डोस देण्यात आले होते. त्यावेळीच देशातील ५० टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस पूर्ण झाल्याची नोंद झाली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला आहे. लसीकरणाचा वेग कायम ठेवण्यात येणार आहे.
देशातील लसीकरणाच्या या विक्रमाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या #SabkoVaccineMuftVaccine अभियानाला जाते. मोदींचे प्रयत्न आणि सातत्याने श्रम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं आहे. देशात दिवसेंदिवस लसीकरणाची संख्या वाढत आहे. यासाठी सर्व भारतीय नागरिकांचे अभिनंदन ! – मनसुख मडाविया, केंद्रीय आरोग्यमंत्री
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App