Regional security summit : सुरक्षित आणि स्थिर अफगाणिस्तानसाठी आठ देश मिळून करणार प्रयत्न


 विशेष प्रतिनिधी

दिल्ली : ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आली आणि त्यानंतर तेथील बऱ्याच नागरिकांनी अफगाणिस्तान देश सोडण्यास सुरवात केली. शिक्षण, उद्योग तसेच व्यापार अशा बऱ्याच मूलभूत गोष्टींसाठी अफगाणिस्तानमधील लोकांचा रोजचा संघर्ष सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर भारताने रिजनल सिक्युरिटी समिट अायाेजित केली हाेती.

Regional security summit: Eight countries will work together for a secure and stable Afghanistan

या समिटमध्ये आठ देशांनी भाग घेतला होता. इंडिया, रशिया, इराण, कझाकिस्तान, किरगिस्तान, उजबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि ताजिकिस्तान इत्यादी देशांनी या समिटमध्ये भाग घेतला होता. या देशांच्या सुरक्षा सल्लागारांनी आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते. या सर्व देशांनी माणुसकीच्या नात्याने अफगाणिस्तान मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.


AFGANISTAN : तालिबानची कथनी एक करनी एक : शांततेचे आश्वासन देऊन तालिबानचा काबूल विमानतळावर महिला आणि मुलांवर हल्ला


या समिट मध्ये झालेल्या चर्चे नुसार, अफगाणिस्तान तसेच अफगाणिस्तानच्या कोणत्याही सीमा रिफ्युजीसाठी किंवा कोणत्याही आतंकवादी प्रशिक्षणासाठी वापरता येणार नाहीत. तालिबानमधील सद्य राजकीय स्थिती पाहता आतंकवाद तसेच मदत पदार्थांचा व्यापार या सर्व गोष्टींवर या समिटमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच अफगाणिस्तानला जागतिक दहशतवादाचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणू न देण्याच्या दृष्टीने दहशतवादाचा वित्तपुरवठा, दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे, कट्टरपंथीय विरुद्ध लढाईसाठी एकत्रितपणे काम करण्याचे ठरवले आहे.

तसेच महिलांचे मूलभूत अधिकार, लहान मूले आणि अल्पसंख्याक समुदाय याचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला होता.

चीन देशाने वेळेचे कारण देऊन ह्या बैठकीत भाग घेण्यास नकार कळवला होता. पाकिस्तान ने देखील ह्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचे धोरण अवलंबले होते.

Regional security summit: Eight countries will work together for a secure and stable Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात