विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू काश्मीलरच्या अखनूर सेक्टरच्या कानाचक येथे पोलिसांनी एक ड्रोन पाडले. या ड्रोनमधून पाच किलो आयईडी स्फोटके हस्तगत करण्यात आले आहेत. हे ड्रोन भारतीय सीमेपासून सहा किलोमीटर आतपर्यत आले होते.Police attacked on Drone in Jammu
ड्रोनचे वजन १७ किलो असून त्याचे सुटे भाग चीन, हॉंगकॉंग आणि तैवान येथे तयार केलेले आहेत. याच श्रेणीतील ड्रोन कथुआ येथे सापडले होते. आतापर्यंत पाठवलेल्या ड्रोनमधून १६ एके-४७ रायफल्स, ३४ पिस्तूल, १५ ग्रेनेड, आयईडी आणि चार लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
जम्मू विभागाचे पोलिस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, रात्री १ वाजता सीमेवर ड्रोन आढळून आले. ड्रोनच्या माध्यमातून आणलेले आयईडी स्फोटके तयार स्थितीत होते. त्यावर जीपीएस यंत्रणा होती. हा ड्रोन दहशतवाद्याच्या गटापर्यंत जाणार होता.
परंतु स्फोटके कोणत्या भागात जाणार होते, हे मात्र समजू शकले नाही. सीमेपासून सुमारे पाच ते सहा किलोमीटर आत आलेले ड्रोन पोलिसांनी पाडून दहशतवाद्यांचा मोठा कट हाणून पाडला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App