भारताकडून साखर आणि कापसाच्या आयातीला मान्यता देणार्या पाकिस्तानने (Pakistan) आता आपल्या निर्णय फिरवला आहे. भारताकडून आयातीचा निर्णय घेतल्याने इम्रान खान सरकारवर टीकेची झोड उठली होती. यामुळे केवळ देशांतर्गत राजकारणाला बळी पडून इम्रान खान यांनी भारताकडून आयातीचा निर्णय रद्द केला आहे. Pakistans U-turn From resuming Import From India
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताकडून साखर आणि कापसाच्या आयातीला मान्यता देणार्या पाकिस्तानने आता आपल्या निर्णय फिरवला आहे. भारताकडून आयातीचा निर्णय घेतल्याने इम्रान खान सरकारवर टीकेची झोड उठली होती. यामुळे केवळ देशांतर्गत राजकारणाला बळी पडून इम्रान खान यांनी भारताकडून आयातीचा निर्णय रद्द केला आहे.
गुरुवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी समितीच्या निर्णयाला बदलण्यास मान्यता देण्यात आली. यापूर्वी पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने भारताकडून साखर आणि कापसाच्या आयातीला मान्यता दिली. वस्तुतः पाकिस्तानमध्ये या उत्पादनांच्या महागाईत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत महागाईचा सामना करण्यासाठी भारताकडून आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण यावरही राजकारणाची सुरुवात झाली आणि दबावाखाली इम्रान खान सरकारने हा निर्णय पलटविला.
हा निर्णय फिरवण्याबद्दल पाकिस्तानकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. जर आर्थिक समन्वय समितीचा निर्णय अस्तित्वात आला असता तर दोन वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार सुरू झाला असता. खरे तर, ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून भारताने कलम 370 काढून टाकल्यानंतर पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. बुधवारी पाकिस्तानचे नवे अर्थमंत्री हम्मद अझर यांनी भारताशी व्यापार सुरू करण्याची घोषणा केली. त्यांनी भारताकडून कापूस आणि साखर आयातीबाबतचा निर्णय जाहीर केला होता.
यापूर्वी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पाकिस्तानकडून भारताबरोबर व्यवसाय सुरू करण्याच्या निर्णयाकडे एक सराव म्हणून पाहिले जात होते. दोन्ही देशांच्या सैन्यानेही गेल्या महिन्यात नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीवर सहमती दर्शविली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी हम्मद अझर यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली.
अर्थमंत्री हम्मद अझर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, पाकिस्तानमधील साखरेचे वाढते दर आणि कापसाचा तुटवडा यास सामोरे जाण्यासाठी भारताकडून आयातीला मान्यता देण्यात येईल. यानंतर आर्थिक समन्वय समितीने खासगी क्षेत्रातून 5 लाख टन साखर आयतीला मंजुरी दिली. त्याशिवाय सूक्ष्म व लघु उद्योगांच्या गरजा भागविता याव्यात म्हणून जूनअखेर कापूस आयात करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.
Pakistans U-turn From resuming Import From India
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App