वृत्तसंस्था
नंदीग्राम – दीदी, तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातून फॉर्म भरणार आहात, असे ऐकलेय… खरे आहे का…, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ड़िवचल्यानंतर ममतांनी देखील त्यांना नंदीग्राममधून प्रत्युत्तर दिले आहे. Why Narendra Modi comes to Bengal on every polling day? Why will he campaign on election day? Isn’t it a violation of model code of conduct?: WB CM
ममता म्हणाल्या, मोदीजी…, तुम्ही बरोबर मतदानाच्या दिवशी बंगालमध्ये येऊन कसा प्रचार करता. दूरदर्शनपासून वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून मतदान चालू असलेल्या मतदारसंघांवर देखील प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करता… हा तर निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. बाकी कोणी मतदानाच्या दिवशी प्रचार करीत नाही. एकटे मोदीच प्रचार करताना दिसतात, असा आरोपही ममतांनी केला.
त्याचवेळी ममतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. अमित शहा हे केंद्रीय राखीव दलांवर भाजपच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी दबाव आणत आहेत. आम्ही निवडणूक आयोगाच्या हे वारंवार लक्षात आणून दिले. त्यांना निवेदने, अर्ज दिले पण निवडणूक आयोगाने भाजप विऱोधात कोणतीही कारवाई केली नाही. उलट ते पक्षपाताने भाजपच्याच उमेदवारांना मदत करताना आढळलेत, असा आरोप ममतांनी लावला.
Why Narendra Modi comes to Bengal on every polling day? Why will he campaign on election day? If we can't campaign in election areas then why he addresses the people with all facilities including Doordarshan on polling day? Isn't it a violation of model code of conduct?: WB CM — ANI (@ANI) April 1, 2021
Why Narendra Modi comes to Bengal on every polling day? Why will he campaign on election day? If we can't campaign in election areas then why he addresses the people with all facilities including Doordarshan on polling day? Isn't it a violation of model code of conduct?: WB CM
— ANI (@ANI) April 1, 2021
तत्पूर्वी, ममतांनी दिवसभर आज नंदीग्राममध्ये ठाण मांडून दुपारनंतर मतदान केंद्रावरच आंदोलन केले. त्यांनी तेथूनच राज्यपालांना फोन लावण्याचा राजकीय ड्रामा केला. ममतांनी मतदान रोखण्यासाठीच हा ड्रामा केल्याचा आरोप सुवेंदू अधिकारी यांनी केला. ममतांनी आंदोलन करून दोन तास मतदान रोखून धरले. त्यामुळे येथे ७८ टक्केच मतदान होऊ शकले. पण नंदीग्राम मतदारसंघात अन्यत्र ९० टक्क्यांपर्यंत मतदान झाले, असे सुवेंदू अधिकारी यांनी पत्रकारांना सांगितले.
तर निवडणूक आयोगाने काहीही केले आणि भाजपने नंदीग्राममध्ये कितीही जंगजंग पछाडले तरी येथले ९० टक्के मतदान तृणमूळ काँग्रेसलाच झाले आहे. त्यामुळे आपला विजय पक्का असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App