विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – दक्षिण आफ्रिकेत २४ नोव्हेंबर रोजी ओमिक्रॉन आढळल्यानंतर या संसर्गाने ५८ देशांपर्यंत धडक मारली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक अहवालात आतापर्यंत ५८ देशांत ओमिक्रॉनचा संसर्ग पसरल्याचे म्हटले आहे.Omricon reaches in 58 nations
फायजर, बायोएनटेकने मात्र ॲटी कोविड व्हॅक्सिन ओमिक्रॉन संसर्गाला रोखण्यास यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. जर्मनीत कोरोना संसर्गामुळे स्थिती बिकट होत चालली आहे. एका दिवसांतच ५२७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या १२ फेब्रुवारीनंतर सर्वाधिक आहे.
जर्मनीत कोरोना संसर्गाने आतापर्यंत १.०४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात ६९,६०१ नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंत जर्मनीत ६२.२७ लाख जणांना कोरोनाची लागण झाली असून ५२.२५ लाख जण बरे झाले आहेत.
दक्षिण आफ्रिकेत कोरोना संसर्गामुळे स्थिती पुन्हा ढासळली आहे. दोन दिवसात रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण दुप्पटीने झाला आहे. युरोपियन हेल्थ संस्थेने युरोपातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता सजग राहण्याचा इशारा दिला आहे. आगामी काळात युरोपीय देशांत कोविड रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढेल, असा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App