Omicron in Delhi : नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला; भारतातील रुग्णसंख्या ५ वर


  • जगभरात पसरत असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात सर्वत्र खबरदारी घेतली जात असतानाच आता पाचवा रुग्ण आढळला.
  • सर्वात आधी गेल्या आठवड्यात कर्नाटकात दोन रुग्ण आढळून आले. त्यानंतर शनिवारी (4 डिसेंबर) गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. सर्वत्र खबरदारी घेतली जात असून, भारतातही प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच जोखमीच्या देशांसह इतर राष्ट्रांतून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. असं असतानाच भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पाचव्या रुग्णांची नोंद झाली आहे. The first Omicron patient was found in New Delhi

दिल्लीत आलेल्या एका प्रवाशाला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं असून, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी ही माहिती दिली.


OMICRON : ओमायक्रॉनमुळे पंढरपुर विठ्ठल मंदिरात ‘अलर्ट’; दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमांची सक्ती


राजधानी दिल्लीत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी याची माहिती दिली. आणखी एक रुग्ण आढळून आल्यामुळे देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 5 झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचं निदान झालेला हा रुग्ण टांझानियातून भारतात आला आहे. त्याला आता लोक नायक जय प्रकाश नारायण रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 17 रुग्णांना लोक नायक जय प्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 12 जणांचे जिनोम सिक्वेन्सिगही झालं आहे. त्या 12 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला असल्याचं निष्पन्न झालं आहे.

ओमिक्रॉन संक्रमित रुग्णाबद्दल माहिती देत असतानाच जैन यांनी या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झालेल्या देशांतून येणारी विमान थांबवायला हवीत, अशी मागणीही केंद्राकडे केली आहे. जोखमीच्या (हाय रिस्क) देशांसह इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने नियमावली निश्चित केली आहे. सर्वच विमानतळांवर याची अमलबजावणी केली जात असून, आतापर्यंत देशात 5 ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत.

The first Omicron patient was found in New Delhi

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर