राज्यांचे विकास आराखडे आणि योजना घेऊनच भाजपचे सर्व मुख्यमंत्री आज पोहोचणार काशीमध्ये


काशी विश्वनाथाच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांचा गव्हर्नन्सवर विशेषAll BJP chief ministers will reach Kashi today with state development plans and plans


विशेष प्रतिनिधी

काशी : भारतात आज सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार ऐतिहासिक दिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 1:27 वाजता काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन होत आहे. पण हा साधासुधा उद्घाटन सोहळा नाही. यानिमित्ताने देशाच्या विकासाचे महामंथन काशी विश्वनाथाच्या साक्षीने होणार आहे.

भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपापल्या राज्यांमधील विकास कामांची आराखडे आणि योजना घेऊन काशीमध्ये दाखल होत आहेत. आज उद्या आणि परवा म्हणजे 13 14 आणि 15 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आपापल्या राज्याच्या विकासाचे मंथन काशी विश्वनाथाचे साक्षीने करणार आहेत.



काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देशव्यापी विकासाचे जे मंथन होणार आहे, त्याची सुरुवात भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीने होणार आहे.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सहभागी होऊन गव्हर्नन्स अर्थात शासन व्यवस्था याविषयी सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष हे देखील सहभागी होणार आहेत.

भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री 13 तारखेला दुपारपर्यंत काशीमध्ये दाखल होणार असून त्यानंतर दोन दिवस ते काशीवास करून राहणार आहेत. या काशीवासात सर्व मुख्यमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रम आहेत. परंतु त्यामध्ये ग्लॅमरपेक्षा बैठका, विकास कामांचे आराखडे आपापल्या राज्यांच्या धार्मिक पर्यटनाच्या विकास योजना या विषयीची प्रामुख्याने चर्चा आणि निर्णय अपेक्षित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती सर्व बाजूंनी विचार करून वेगवान निर्णय घेणे ही आहे. त्यासंदर्भातले महत्त्वाचे मार्गदर्शन पंतप्रधान मोदी स्वतः या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग, गुजरात भूपेंद्र पटेल,

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वकर्मा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसावराज बोम्मई, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव, तसेच अरुणाचल, बिहार मणिपूर या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यामध्ये सहभागी होणार आहेत.

या राज्यांमध्ये जी विशेष महत्त्वाची धार्मिक स्थळे अथवा पर्यटन स्थळे आहेत त्यासंबंधींचा ठोस विकास आराखडा दोन – तीन धार्मिक – पर्यटन स्थळे एकमेकांना जोडणे, तेथील पायाभूत विकास योजना आखणे आणि त्याविषयीच्या महत्त्वाच्या निर्णयांचे मार्गदर्शन हे मुख्यमंत्र्यांचा काशी दौऱ्याचे सार असणार आहे!!

पंतप्रधान मोदी यांच्या समवेत सर्व मुख्यमंत्री हे गंगा आरतीमध्ये देखील सहभागी होणार आहेत. परंतु तो त्यांचा जाहीर कार्यक्रम आहे. त्यापेक्षाही महत्वाचा कार्यक्रम म्हणजे पंतप्रधानांसमवेतच्या बैठकीमध्ये विकास आराखड्यांबद्दल विशेषत्वाने चर्चा आणि निर्णय हा असणार आहे. त्यामुळे या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्व तयारीनिशी काशीमध्ये दाखल होत आहेत.

सर्व मुख्यमंत्र्यांनी आज आपापल्या राज्यांमध्ये वरिष्ठ मंत्र्यांबरोबर आणि राज्यातल्या विविध खात्यांच्या सचिवांबरोबर विशेष बैठका घेतल्या. त्यांनी तयार केलेले विकास आराखडे, महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांची स्थळांच्या गरजा, तिथले पर्यटन पोटेन्शियल याविषयीची अद्ययावत माहिती सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करून घेतली आहे.

त्यांचे सादरीकरण सर्व मुख्यमंत्री पंतप्रधानांसमवेत शेअर करणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सर्व मुख्यमंत्र्यांची त्यांच्या राज्यांमधील विकासकामांबद्दल आणि योजनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहेत. या चर्चेमधूनच संबंधित राज्यांचे विकास आराखडे अंतिम स्वरूपात येणार आहेत.

All BJP chief ministers will reach Kashi today with state development plans and plans

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात