विशेष प्रतिनिधी
सियोल : दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यामधील 70 वर्षापूर्वीची दुश्मनी आता समाप्त होणार अशी चिन्हे दिसत असताना उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये संवाद पुन्हा पूर्ववत होण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी हॉटलाईन संपर्क पुन्हा सुरू करण्यात आला आहे, असे उत्तर कोरियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते.
North Korea launched new hypersonic missile, believed to have nuclear capabilities
याच पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने नव्याने विकसित केलेल्या विमानविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राला हायपरसोनिक मिसाईल असे म्हटले जाते.
या चाचणीनंतर अमेरिकेचे विदेशमंत्री अन्टोनी ब्लिकन यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही चाचणी जगामध्ये असुरक्षितता आणि अस्थिरता याला बढावा देणारी आहे.
अमेरिकेचा दक्षिण कोरियाबरोबर युद्धसराव; उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोग यांची बहिण संतापली
या विधानावर उलट वार करताना किम जोंग उन यांनी अमेरिकेला राजनैतिक खेळी करत असल्याचा आरोप केला आहे. तर उत्तर कोरियाने नुकत्याच पार पडलेल्या चाचणीमुळे युनायटेड नेशन्सने देखील चिंता व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App