अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्यानंतर काय म्हणाली नोबेल विजेती मलाला युसूफझाई, वाचा सविस्तर तिची प्रतिक्रिया…

nobel prize winner malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil

 malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil : अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईचे वक्तव्य समोर आले आहे. ती म्हणाली की, अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे मोठा धक्का बसला आहे. मलाला म्हणाली की, महिला, अल्पसंख्याक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या स्थितीबद्दल तिला खूप काळजी वाटतेय. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर ताबा मिळवल्यानंतर मलालाची ही पहिली प्रतिक्रिया आहे. nobel prize winner malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil


वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईचे वक्तव्य समोर आले आहे. ती म्हणाली की, अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे मोठा धक्का बसला आहे. मलाला म्हणाली की, महिला, अल्पसंख्याक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या स्थितीबद्दल तिला खूप काळजी वाटतेय. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर ताबा मिळवल्यानंतर मलालाची ही पहिली प्रतिक्रिया आहे.

मलालने ट्वीट केले की, “अफगाणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे, हे पाहून आम्हा सर्वांना खूप धक्का बसला आहे. मला तिथल्या महिला, अल्पसंख्याक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची खूप चिंता आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक शक्तींनी त्वरित युद्धविरामाचे आवाहन करावे, त्वरित मानवतावादी मदत द्यावी आणि निर्वासित व नागरिकांचे संरक्षण केले पाहिजे.”

मलाला युसूफझाई आधीपासूनच तालिबानच्या निशाण्यावर राहिलेली आहे. त्यामुळेच मलालाला पाकिस्तान सोडावे लागले. खरं तर केवळ मलालाच नाही, जगभरातील अनेक लोकांना अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहून मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानात भारतासह अनेक देशांनी अनेक प्रकल्पांची उभारणी केली होती, आता या त्यांचे भविष्य अंधारात लोटले आहे.

nobel prize winner malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात