वृत्तसंस्था
केपटाऊन : कोरोना महामारी जिथून सुरू झाली तिथून हा विषाणू मरत असल्याचे दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने आता कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. आता देशात ना लॉकडाऊन लागू होणार आहे ना कोणाला क्वारंटाईन केले जाणार आहे. No lockdown, Nither quarantine South African government”s decision
पीटीआयच्या एका अहवालात (pti report)म्हटले आहे की, वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये सरकारने साथीच्या रोगाकडे व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
९ जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेच्या तज्ञांनी त्यांच्या अहवालात सांगितले की वारंवार लॉकडाउनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर, उपजीविकेवर आणि इतर पैलूंवर खोलवर परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारने जगाच्या दृष्टीने अनावश्यक कोविड प्रोटोकॉलचे ( Unnecessary Covid Protocol) पालन करणे टाळावे, कारण स्थानिक पातळीवर ते शक्य नाही.
दक्षिण आफ्रिका चौथ्या लाटेशी झुंज देत आहे दक्षिण आफ्रिका सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेशी झुंज देत आहे. येथे मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉन बाधित रुग्ण येत आहेत. कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये आतापर्यंत ३५लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ९३,२७८ मृत्यू झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App