विशेष प्रतिनिधी
टोरांटो : अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी भारतीयांचे नऊ लाखांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. ही संख्या २०३० पर्यंत सुमारे २२ लाखांपर्यंत जाणार आहे. हे सर्व जण अनेक वर्षे अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्याची वाट पहात आहेत.Nine lakh plea pending for green card
त्यामुळे इतर भारतीयही अर्ज करताना दुसऱ्या पर्यायाचाही शोध घेत आहेत. त्यामुळे अमेरिका सरकारने प्रयत्नपूर्वक ही संख्या कमी करावी, असे मत ‘नॅशनल फौंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी’चे कार्यकारी संचालक स्टुअर्ट अँडरसन यांनी संसदीय समितीसमोर सांगितले. ‘
उच्च कौशल्ये असलेल्या भारतीय तंत्रज्ञांचा ओढा कॅनडाकडे वाढत असून अमेरिकेचे त्यांचे आकर्षण कमी झाले आहे. या बदलाला अमेरिकेचे कालबाह्य ठरलेले व्हिसाधोरण कारणीभूत असल्याचा अहवाल तज्ज्ञांनी अमेरिकेच्या संसदेला सादर केला आहे.
अमेरिकेच्या कालबाह्य धोरणांमुळे अत्यंत हुशार विदेशी विद्यार्थी आणि कर्मचारी कॅनडाची निवड करत आहेत. आपल्या एच-१बी धोरणाअंतर्गत काम करणे किती अवघड बनत चालले आहे, हेच यावरुन सिद्ध होते आहे. कॅनडात मात्र विदेशी विद्यार्थ्यांना अनेक सवलती मिळत आहेत,’ असे अँडरसन यांनी म्हटले आहे.
प्रत्येक देशाला व्हिसाचा कोटा ठरवून दिल्याने अनेक उच्चशिक्षीत भारतीय कॅनडाला जात आहेत. अमेरिकेच्या हितासाठी या भारतीयांना पुन्हा आकषूर्ण घेण्यासाठी योग्य ते करावेत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App