निक्की हेली म्हणाल्या- चीन युद्धाच्या तयारीत, अमेरिका आणि जगासाठी धोका, त्यांचे सैन्य अनेक बाबतींत पुढे

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार होण्याच्या शर्यतीत असलेल्या निक्की हेली यांनी चीन हा अमेरिका आणि संपूर्ण जगासाठी अस्तित्वाचा धोका असल्याचे म्हटले आहे. चीन युद्धाच्या तयारीत असल्याचेही त्या म्हणाल्या. चीन गेल्या 50 वर्षांपासून अमेरिकेला पराभूत करण्याचा कट रचत आहे आणि अनेक प्रकारे चीनच्या सैन्याची क्षमता अमेरिकन सैन्याच्या बरोबरीची आहे.Nikki Haley said – China is preparing for war, a threat to America and the world, their military is ahead in many aspects

शुक्रवारी न्यू हॅम्पशायरमध्ये अर्थव्यवस्थेवर भाषण देताना हेली यांनी ही वक्तव्ये केली. निक्की म्हणाल्या- चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे, त्यांना एक मोठे आणि प्रगत सैन्य तयार करायचे आहे, जे अमेरिकेला घाबरवण्यास सक्षम असेल. याद्वारे त्यांना आशिया आणि त्यापलीकडे प्रभाव वाढवायचा आहे. चीनचे सैन्य काही बाबतीत आपल्या बरोबरीचे आहे, तर काही बाबतीत ते आपल्यापेक्षाही पुढे आहे.



निक्की म्हणाल्या- चीनने अमेरिकेकडून नोकऱ्या हिसकाल्या

चीनच्या नेत्यांना एवढा विश्वास आहे की, ते स्पाय बलून आपल्या हवाई क्षेत्रात पाठवत आहेत. याशिवाय ते क्युबाजवळ हेरगिरीसाठी तळही तयार करत आहेत. कम्युनिस्ट पक्ष युद्धाच्या तयारीत आहे आणि चीनच्या नेत्यांचा विजयाचा इरादा आहे. चीनने उत्पादन क्षेत्रात अमेरिकेकडून नोकऱ्या हिसकावून घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांनी अमेरिकेची व्यापार गुपिते घेऊन महत्त्वाचे उद्योग ताब्यात घेतले आहेत. या उद्योगांमध्ये औषध ते प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामुळे चीन विक्रमी वेळेत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशातून जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे.

अध्यक्ष झाल्यास कर कमी करण्याचे आश्वासन

यानंतर निक्की हेली यांनी आर्थिक योजना सांगितली. जर त्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर अमेरिकेतील लोकांच्या जीवनात काय बदल घडवून आणतील, हेही त्यांनी सांगितले. करात कपात करणे, नोकरशहांच्या कार्यकाळावर मर्यादा घालणे आणि अनावश्यक बिले हटवण्याविषयी त्या बोलल्या.

यापूर्वी भारतीय वंशाचे दुसरे उमेदवार विवेक रामास्वामी चीनपासून आर्थिक स्वातंत्र्याबाबत बोलले होते. ते म्हणाले होते- मला भारतासह इतर देशांशी संबंध आणखी सुधारायचे आहेत, जेणेकरून चीनवरील आपले अवलंबित्व कमी करता येईल.

Nikki Haley said – China is preparing for war, a threat to America and the world, their military is ahead in many aspects

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात