विशेष प्रतिनिधी
काबुल : ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीने ताबा मिळवला आहे. या वेळी जवळपास 5000 अफगाणिस्तानमधील लोकांना इटलीने आश्रय दिला आहे. अश्या प्रकारे अफगाणिस्तान मधून बरेच लोक भारत, इराण, युरोप, तुर्की, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा येथे स्थलांतरित झाले आहेत.
Nearly half a million Afghans have internally displaced in 2021
पण जे लोक स्थलांतरित झालेले नाहीत ते ही आपल्या राहत्या घरी सुखात आहेत असेही अजिबात नाहीये. नुकताच युनायटेड नेशन्स मायग्रेशन एजन्सी द्वारे प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान मध्येच स्थलांतरित झालेल्या लोकांची एकूण संख्या ही अर्धा दशलक्ष इतकी आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने केलेल्या पाहिणी नुसार 1 जानेवारी 2021 ते 21 नोव्हेंबर 2021 या काळात एकूण 6,67,900 लोक देशातच स्थलांतरित झाले आहेत.
Afghanistan Crisis: भारताकडून NSA स्तरावरील बैठक-चीनचा नकार; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा
तसेच बाकी देशात मागील काही वर्षांपासून स्थलांतरित झालेले बरेच लोक पुन्हा मायदेशी परतत आहेत. 2021 या वर्षी पाकिस्तान आणि इराण मधून जवळपास 1.146 दशलक्ष लोक अफगाणिस्तान मध्ये परत आले आहेत. ह्या लोकांकडून कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाहीये.
तालिबान राजवट लागू झाल्यापासून देशात 95% लोक हे दारिद्र्य रेषेखालील आयुष्य जगत आहेत. तर देशाची अर्थव्यवस्था 35% नी ढासळली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App