जगात सर्वत्रच कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, हाँगकाँगवर लाखो लसींचे डोस फेकून देण्याची वेळ येण्याची भीती आहे. या लसींची एक्स्पायरी डेट जवळ आल्याने हे डोस फेकून द्यावे लागू शकतात असा इशारा हाँगकाँग सरकारने दिला आहे. याचे कारण म्हणजे लोक लसीकरणासाठी पुढेच येत नाहीत. आत्तापर्यंत केवळ १९ टक्केच लोकांनी लसीकरण करून घेतले आहे. केवळ तीन महिन्यांचा वेळ आपल्या हातात असल्याचे सरकारने म्हटले आहे.Millions of corona vaccines to be dropped in Hong Kong, may be expire in three months
विशेष प्रतिनिधी
हाँगकाँग : जगात सर्वत्रच कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, हॉंगकॉंगवर लाखो लसींचे डोस फेकून देण्याची वेळ येण्याची भीती आहे. या लसींची एक्स्पायरी डेट जवळ आल्याने हे डोस फेकून द्यावे लागू शकतात असा इशारा हाँगकाँग सरकारने दिला आहे.
याचे कारण म्हणजे लोक लसीकरणासाठी पुढेच येत नाहीत. आत्तापर्यंत केवळ १९ टक्केच लोकांनी लसीकरण करून घेतले आहे. केवळ तीन महिन्यांचा वेळ आपल्या हातात असल्याचे सरकारने म्हटले आहे.
हाँगकाँगने आपल्या संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करण्याचे ठरविले आहे. यासाठी फायजर- बायोएनटेक आणि चीनच्या सिनोव्हॅक या लसीचे ७५ लाख डोस सरकारने विकत घेतले आहेत. सिनोव्हॅक लसील अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिलेली नाही. तरीही हॉंगकॉंगमध्ये ही लस उपलब्ध आहे.
हाँगकाँगमध्ये संपूर्ण लोकसंख्येसाठी लस उपलब्ध असतानाही लोक लसीकरणासाठी पुढे येण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत केवळ १९ टक्के लोकांनीच एक डोस घेतला आहे. १४ टक्के लोकांनीच दोन डोस घेतले आहेत.
सामान्य नागरिकच नव्हे तर आरोग्य कर्मचारीही लसीकरण करून घेण्यासाठी उत्साहित नाहीत. केवळ एक तृतियांश आरोग्य कर्मचाऱ्यांचेच लसीकरण झाले आहे. हाँगकाँगचे सरकार चीनधार्जिणे आहे.
त्यामुळे नागरिकांचा या सरकारवर विश्वास नाही. संपूर्ण जगात कोरोनाचा कहर होत असताना हाँगकाँगमध्ये कोरोनाचा प्रसार वाढलेला नाही. कोरोना महामारीला सुरूवात झाल्यापासून अौत्तापर्यंत केवळ २३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
फायजर बायोएनटेकच्य लसीचे ३२ लाख ६३ हजार डोस हाँगकाँगने खरेदी केले होते. त्यांची एक्स्पायरी डेट सहा महिने आहे. मात्र, त्यापैकी केवळ १२ लाख ३१ हजार ६०० डोसच वापरण्यात आले आहेत.
सिनोव्हॅक लसीचे २० लाख डोस हॉंगकॉंगला पाठविण्यात आले होते. त्यांची एक्स्पायरी एक वर्ष आहे. हाँगकाँगकडे लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने चाळीस हजार चीन नागरिक आणि १३ हजार निर्वासितांना लस देण्याची तयारी सरकारने दाखविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App