विशेष प्रतिनिधी
काबुल : ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट लागू झाली आहे. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे. त्याचवेळी दुष्काळ, बदललेली राजवट, त्यामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि मुख्य म्हणजे कोरोना सिच्युएशन यामुळे तेथे लोकांचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहेत.
Malnutrition: The plight of children in Afghanistan
इंदिरा गांधी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील अधिकार्याने सांगितले की, दवाखान्यांमध्ये दाखल होणार्या लोकांमध्ये मुलांची संख्या सर्वात जास्त आहे. बरीच मुले कुपोषणाच्या आहारी गेलेली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण देखील वाढलेले आहे. अपुऱ्या वैद्यकीय सेवा, साधनसामुग्रीचा आभाव यामुळे आम्हाला उपचार करणे देखील कठीण झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून या मुलांसाठी लवकरात लवकर मदत मिळणे हे गरजेचे झाले आहे असे अधिकाऱ्यानी सांगितले आहे.
Afghanistan Crisis : अफगाणी लढवय्या नेता अमरुल्लाह सालेह यांच्या मोठ्या भावाची हत्या, तालिबान्यांनी छळ करून ठार मारले
इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी फेज क्लासिफिकेशनने नुकत्याच सादर केल्या माहितीच्या आधारे, अफगाणिस्तान मधील प्रत्येक दोन नागरिकांमधील एका नागरिकाला फेज थ्री आणि फेस फोर फूड क्रायसिस चा सामना करावा लागणार आहे. त्यात कोरोना परिस्थिती, दुष्काळ या सर्व घटकांचा लोकांवर प्रचंड मोठा परिणाम झालेला दिसून येतोय.
अफगाणिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या 37 टक्के लोक मागील एप्रिलपासून भूक ह्या समस्येचा सामना करत आहेत. युनायटेड नेशन्श चिल्ड्रेन्स फंड द्वारे या वेळी इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील 1 मिलियन बालक कुपोषणाच्या आहारी जाण्याची शक्यता आहे, अशी धक्कादायक माहितीदेखील युनायटेड नेशन्सने दिली आहे. त्यामुळे लवकरच विविध देशातून मदतीचा एक हात पुढे केला गेला पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App