भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी शनिवारी लंडनमध्ये म्हटले की, ब्रिटन सरकारने मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात आश्वासन दिले आहे. यामुळे त्याला परत आणण्याची आशा वाढली आहे. Mallya’s extradition Foreign Secretary Sringala says Great assurance given by Britain, hopes for mallya return increased
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून पळ काढणाऱ्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात पुन्हा एकदा बातम्या समोर येत आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला ब्रिटन दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी लंडनमध्ये म्हटले की, ब्रिटन सरकारने मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात ‘आश्वासन’ दिले आहे.
दोन दिवसांच्या यूके दौर्यादरम्यान श्रृंगला यांनी यूके फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस (एफसीडीओ) च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर बैठक घेतली. 2030 – भारत-युके भागीदारी मजबूत करण्यासाठी रोडमॅपचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
शृंगला यांनी सांगितले की, भारत मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ठाम आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते की, मल्ल्या आर्थिक गुन्ह्यांच्या संदर्भात गुन्हेगार आहे. त्याच्यावर फसवणूक, मनी लाँडरिंग आणि बंद झालेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे कर्ज न भरल्याची प्रकरणे प्रलंबित आहेत.
परराष्ट्र सचिव म्हणाले की, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात भारत सरकारला ठोस आश्वासन दिले आहे. दोनदिवसीय भेटीदरम्यान शृंगला यांनी फरार आर्थिक गुन्हेगारांना भारतात पाठवण्यावर सविस्तर चर्चा केली.
परराष्ट्र सचिवांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, त्यांच्या देशात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यानुसार मल्ल्याच्या प्रकरणात कार्यवाही सुरू आहे. मल्ल्या सर्व कायदेशीर लढाई हारल्यानंतर तो तेथे गुप्तपणे आश्रयासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेतही असल्याचे समजते.
ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त गायत्री इस्सर कुमार यांनी सांगितले की, लंडनमधील भारतीय दूतावासावर या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहे. उच्च न्यायालयाचा म्हणण्यानुसार प्रत्यार्पण निश्चित आहे, फक्त काही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App