अमेरिकी ग्राहकांना दिल्लीतून बनावट कॉल करुन फसविणाऱ्या १९ जणांना अटक


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बनावट कॉल सेंटरद्वारे अमेरिकी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी पकडले आहे. कॉल करणारी मंडळी ही अमेरिकी ग्राहकांना अर्थमंत्रालयाचे अधिकारी म्हणून बोलत असत. या सेंटरकडून अमेरिकेच्या निवडक नागरिकांना मोफत अनुदानही देण्यात आले होते. पोलिसांच्या मते, दररोज अमेरिकेच्या सरासरी तीन लोकांना फोन केला जात होता. त्यानुसार ५० हजार ते ७५ हजार रुपयांची फसवणूक केली जात होती. Fraud call center in Delhiसायबर सेलने मालवीय नगरात केलेल्या कारवाईत आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटर उघडकीस आणले. याप्रकरणी १९ जणांना अटक केली आहे. घटनास्थळाहून २२ संगणक, २१ मोबाईल फोन, सहा राउटर आणि तीन स्वीच जप्त केले आहे.

मालवीय नगर भागात बेकायदा कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना एका निनावी मेलद्वारे मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री संशयित ठिकाणी छापे घालण्यात आले. भाड्याच्या घरात जानेवारी २०२१ पासून बनावट कॉल सेंटर सुरू होते, असे पोलिसांनी सांगितले. यात २२ संगणक होते आणि त्यापैकी १५ संगणकाचा उपयोग हा कॉल करण्यासाठी केला जात होता. १६ व्यक्तीत ८ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश होता.

Fraud call center in Delhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण