वृत्तसंस्था
वजीराबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक ए इन्साफ पार्टीचे नेते इमरान खान यांना गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. पाकिस्तानात वजीराबाद मध्ये झालेल्या रॅली दरम्यान एका तरुणाने एके 47 मधून गोळीबार केला. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. Live video of Imran Khan’s assassination attempt exposed
या हत्याकांडाच्या प्रयत्नाचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये इमरान खान यांनी मोठ्या ट्रकच्या टपावर बसून रॅली काढली आहे आणि त्याचवेळी बॅकग्राऊंडला अल्ला चे गाणे वाजत आहे आणि तेवढ्यात एके 47 मधून जोरदार गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू येत आहे.
Footage of the firing. Assassination attempt on Imran Khan. pic.twitter.com/fmSgI2E8jc — Ihtisham Ul Haq (@iihtishamm) November 3, 2022
Footage of the firing. Assassination attempt on Imran Khan. pic.twitter.com/fmSgI2E8jc
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) November 3, 2022
हा गोळीबार सुरू झाल्याबरोबर ट्रकच्या टपावरील लोकांना ताबडतोब लक्षात आले आणि इमरान खान यांच्या भोवतीच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना खाली बसवले. परंतु, गोळीबारात त्यांच्या पायाला जखम झाली या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची अशीच कराची मध्ये रॅली दरम्यानच गोळीबार करून हत्या करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App