Joints for jabs : अमेरिकेत 52 टक्के लोकांना लसीचा कमीतकमी एक डोस मिळाला आहे, तर 42 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तथापि, अजूनही अशी काही राज्ये आहेत जिथे लोकांना लसीबद्दल फारसा उत्साह नाही. वॉशिंग्टनदेखील यापैकी एक राज्य आहे. येथील तरुणांना लसीकरणाकडे आकृष्ट करण्यासाठी ‘लस घ्या अन् मोफत गांजा मिळवा’ (Joints For Jabs) यासारखी अनोखी मोहीम सुरू करण्यात आली आहे. Joints for jabs Washington offers free marijuana to boost Covid vaccine use
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : कोरोना नियंत्रणाचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरणच आहे. म्हणूनच प्रत्येक देश लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेत लसीकरण मोहिमेमुळेच कोरोना नियंत्रित होत आहे. अमेरिकेत सलग 7 ते 8 महिन्यांपासून कोरोनाचे एक लाखाहून रुग्ण आढळत होती. परंतु लसीकरणानंतर तेथे गेल्या काही महिन्यांत रुग्णसंख्या 10 हजारांवर आली आहे.
अमेरिकेत 52 टक्के लोकांना लसीचा कमीतकमी एक डोस मिळाला आहे, तर 42 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तथापि, अजूनही अशी काही राज्ये आहेत जिथे लोकांना लसीबद्दल फारसा उत्साह नाही. वॉशिंग्टनदेखील यापैकी एक राज्य आहे. येथील तरुणांना लसीकरणाकडे आकृष्ट करण्यासाठी ‘लस घ्या अन् मोफत गांजा मिळवा’ (Joints For Jabs) यासारखी अनोखी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
वॉशिंग्टनमध्ये 2012 पासून करमणुकीच्या उद्देशाने गांजाचा वापर कायदेशीर आहे. म्हणूनच येथे अशी मोहीम राबविली जात आहे. नियमांनुसार वॉशिंग्टनमधील कोणत्याही केंद्रावर 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसी देण्याकरिता त्यांना लसीसह गांजाचे एक पाकीट मोफत दिले जाईल. अमेरिकेची बरीच राज्येही लसीकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी अशाच प्रकारच्या ऑफर देत आहेत. कॅलिफोर्निया आणि ओहायो राज्यात लसीकरणासाठी लॉटरी चालवली जात आहे. या ऑफरअंतर्गत लस घेणाऱ्या लोकांना लॉटरीद्वारे रोख बक्षिसे दिली जात आहेत, तर लॉटरीद्वारे शिष्यवृत्तीचे वितरणही केले जात आहे.
काही राज्यांमध्ये स्पोर्ट तिकिटेही दिली जात आहेत, काही राज्यांत विमान तिकिटेही दिली जात आहेत. तर काही राज्यांत लस घेतल्यावर मोफत बिअरचे वाटप केले जात आहे. अरिझोनाने सर्वात प्रथम विनामूल्य गांजा वाटप करण्यास प्रारंभ केला. 4 जुलै रोजी अमेरिकेत स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी जाहीर केले आहे की, या दिवसापर्यंत किमान 70 टक्के प्रौढ अमेरिकन लोकांना लसीचा कमीत-कमी एक डोस मिळायला हवा.
Joints for jabs Washington offers free marijuana to boost Covid vaccine use
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App