लोकांमध्ये भीती, सुनामीबाबत काय अपडेट आहे?
विशेष प्रतिनिधी
जपान : मध्य जपानच्या पश्चिम किनार्यावरील इशिकावा प्रांताच्या नोटो द्वीपकल्पाजवळ सोमवारी (1 जानेवारी) स्थानिक वेळेनुसार 4:10 वाजता 7.6 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे अनेक घरांची पडझड झाली, रस्ते खचले आणि किनारी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.Japan Earthquake As many as 60 earthquakes in just seven hours in Japan
मात्र, आता ‘मोठ्या त्सुनामीची चेतावणी देण्यात आली आहे. त्यामुळे रहिवाशांना घरे रिकामी करण्यास सांगितले जात आहे. जपानच्या समुद्राजवळ राहणाऱ्या हजारो लोकांना उंच जमिनीवर जाण्यास सांगण्यात आले आहे.
भूकंपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लोक संकटात सापडले असून प्रचंड घाबरले आहेत. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी चार वाजल्यापासून मध्य जपानमध्ये डझनभर लहान भूकंप झाले आहेत आणि त्यानंतर आणखी काही भूकंप होण्याची अपेक्षा आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू 37.5 अंश उत्तर अक्षांश आणि 137.2 अंश पूर्व रेखांशावर इशिकावाच्या नोटो प्रदेशात वाजिमाच्या पूर्व-ईशान्य 30 किलोमीटर अंतरावर होता. या भागात मोठ्या भूकंपाचा धोका आहे. हवामान संस्थेच्या मते, त्याची खोली खूपच कमी होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App