विशेष प्रतिनिधी
न्युयोर्क : कोरोना महामारीमुळे मुलांच्या शैक्षणिक आयुष्यावर बराच मोठा परिणाम झाला आहे. युनिसेफने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार, मागील अठरा महिन्यांपासून सुमारे सत्याहत्तर दशलक्ष मुलांनी शाळा अटेंड केली नाहीये. यूएन एजन्सीने येत्या गुरुवारी आपले सर्व सोशल मिडीया चैनल्स पुढील अठरा तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. #Reopen schools for in person learning as soon as possible. हा संदेश जगभरात देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे जवळपास सर्वच शाळा बंद होत्या. या काळामध्ये ऑनलाइन क्लासेस, प्रिंटेड मॉड्युल्स, टीव्ही आणि रेडिओच्या साहाय्याने बऱ्याच देशांनी मुलांचा शैक्षणिक अभ्यासक्रम चालू ठेवण्यात आला होता.
Its been 18 months now that 77 million children across the world have spent out of schools
मुलांचा सर्वांगीण विकास आणि त्यांची सुरक्षा या युनिसेफच्या धोरणाबरोबरच प्रत्येक मुलाचा शाळेत जाण्याचा मूलभत अधिकार हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कोरोनाचा ज्वर काहीसा कमी झाल्यानंतर बरेच रेस्टॉरंट्स, सलोन, जिम वगैरे चालू झाले आहेत. पण शाळा मात्र आजही बंद आहेत, असे युनिसेफ एजन्सीचे म्हणणे आहे. १८ महिन्यांपासून शाळा बंद आहेत आणि यापुढेही शाळा बंद राहणे हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अजिबात हितकारक नाहीये, असे देखील त्यांचे म्हणणे आहे.
सीरम करणार 100 देशांना कोरोना लसीचा पुरवठा ; युनिसेफ UNICEF सोबत केला करार
गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार ११७ देशांमध्ये शाळा पूर्णपणे सुरू झाल्या आहेत. ह्या देशांमधील प्राथमिक शाळा ते माध्यमिक शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५३९ दशलक्ष इतकी आहे. सप्टेंबर २०२० पर्यंत जेमतेम ९४ देशांमधील शाळा काही प्रमाणात सुरू झाल्या होत्या. त्यावेळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जगातील एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या सोळा टक्के इतकी होती. तर गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती नुसार ही संख्या जगातील एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी पस्तीस टक्के इतकी आहे. म्हणजेच २०२० ते २०२१ या काळात म्हणावी तशी ही संख्या वाढलेली नाहीये. आणि याची चिंता युनिसेफला सध्या सतावत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App