सीरम करणार 100 देशांना कोरोना लसीचा पुरवठा ; युनिसेफ UNICEF सोबत केला करार

  • आत्मनिर्भर भारताने जगभर कोरोना लसीचा पुरवठा केला .
  • कोरोना लस खरेदी करण्यासाठी बर्‍याच देशांनी भारताकडे संपर्क साधला आहे.
  • सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि युनिसेफ यांचा कोरोना लस कोविशिल्डच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी करार .
  • या कराराअंतर्गत 100 देशांना 1.1 अब्ज लस डोस .

विशेष प्रतिनिधी

पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि युनिसेफ यांनी कोरोना लस कोविशिल्ड आणि नोव्हाव्हॅक्सच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी करार केला आहे.

या कराराअंतर्गत 100 देशांना 1.1 अब्ज लस डोस पाठविण्यात येणार आहेत. भारत जगातील सर्वात मोठ्या औषधी उत्पादक देशांपैकी एक आहे आणि कोरोना लस खरेदी करण्यासाठी बर्‍याच देशांनी भारताकडे संपर्क साधला आहे. Serum will supply corona vaccine to 100 countries; Agreement with UNICEF


ध्येय पथ पर चल रहे है ; अग्निकांडानंतरही सिरमने लस पाठविली तीन देशांना


कोरोना व्हॅक्सिन कोविशिल्ड पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट तयार करत आहे. युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरीटा फोर यांनी सीरम संस्थेबरोबर कराराची घोषणा केली.

युनिसेफने म्हटले आहे की, आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीच्या मंजुरीच्या अधीन असलेल्या देशांमध्ये या लसींचे वितरण करण्यासाठी एसआयआय बरोबर काम करण्यास उत्सुक आहोत.

कमी उत्पन्न गटाच्या लोकांना कोरोना लस देण्यासाठी COVAX ने पुढाकार घेतला आहे. याच नेतृत्व संयुक्त राष्ट्र संघ करत आहे.

Serum will supply corona vaccine to 100 countries; Agreement with UNICEF

कोवाक्स उपक्रमांतर्गत कोरोना लस 145 देशांतील मजूर आणि निम्न उत्पन्न गटातील लोकांना स्वस्त दराने दिली जाईल. यासाठी कोवाक्समध्ये सामील असलेल्या संघटनांनी कोरोना लस बनविणार्‍या अनेक कंपन्यांशी करार केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*