इस्रायलचा सर्वात भीषण ‘सूड’, हमासच्या गुप्तचर प्रमुखाचे घर उडवले!

हमासच्या हल्ल्याला इस्रायली लष्कर कसे चोख प्रत्युत्तर देत आहे, याचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्करानेही हमासला जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने या हल्ल्यासाठी हमास दहशतवादी गट आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादला जबाबदार धरले आणि आता हमासच्या विरोधात सर्वतोपरी युद्धाची घोषणा केली आणि घुसखोरी करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे. Israels worst revenge Hamas intelligence chiefs house blown up

इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले की, हमासने गंभीर चूक केली आहे, त्याने इस्रायलविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. घुसखोरीच्या प्रत्येक टप्प्यावर आयडीएफ सैनिक शत्रूशी लढत आहेत. मी सर्व नागरिकांना होम फ्रंट कमांडच्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करतो. हे युद्ध इस्रायल जिंकेल.

दुसरीकडे इस्रायली लष्कराने हमासच्या गुप्तचर प्रमुखाच्या घरावर हवाई हल्ला केला आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझा येथील हमासच्या गुप्तचर प्रमुखाच्या घरावर बॉम्बफेक केली आहे. इस्रायली लष्कराने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हवाई हल्ल्यानंतर इमारतीमध्ये स्फोट होताना दिसत आहे.

गाझामध्ये इस्रायलचे बॉम्ब हल्ले, 198 ठार; हमासने 5 हजार रॉकेट डागले, आतापर्यंत 70 इस्रायली मरण पावले

दुसरीकडे, हमासच्या हल्ल्याला इस्रायली लष्कर कसे चोख प्रत्युत्तर देत आहे, याचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. गाझावरील हवाई हल्ल्याच्या व्हिडिओमध्ये इस्रायली लष्कर हमासच्या दहशतवाद्यांचे लपलेले ठिकाण कसे उद्ध्वस्त करत आहे, हे तुम्ही पाहू शकता. एकट्या गाझामध्ये २३२ हून अधिक लोक मारले गेले आहेत तर इस्रायली सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरामध्ये १७००हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Israels worst revenge Hamas intelligence chiefs house blown up

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात