विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल वर रॉकेट हल्ले करून तिथल्या महिला आणि मुलांना देखील लक्ष्य करणाऱ्या त्याचबरोबर महिलांवर बलात्कार करून त्यांचे नग्न धिंड काढणाऱ्या हमास दहशतवादी संघटनेच्या समर्थनात लिबरल अभिनेत्री स्वरा भास्कर, पॉर्नस्टार मिया खलिफा आणि गौहर खान मैदानात उतरल्या आहेत. त्याच वेळी पाकिस्तानी शांतता कमिटीही याच लिबरल्सच्या भाषेत बोलत हमासच्या मैदानासाठी समर्थनासाठी मैदानात आली आहे. in support of Hamas; One language in everyone’s mouth
हमास संघटनेच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ले केले. इस्रायलने त्याला तिखट प्रत्युत्तर दिले. यात दोन्ही बाजूंचे साधारणपणे 1000 सैनिक आणि नागरिक मारले गेलेत. पण हमास दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात सैनिकांपेक्षा इस्रायली नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायल मधल्या 9 शहरांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी नंगानाच घालून महिला आणि मुलांना देखील मारून टाकले. काही महिलांवर बलात्कार करून त्यांची नग्न धिंड काढली. त्याचे शेकडो व्हिडिओ व्हायरल झाले. संपूर्ण जगभरातून हमासचा निषेध झाला. भारत सरकारही इजराइलच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
पण लिबरल अभिनेत्री स्वरा भास्कर, गौहर खान आणि पॉर्नस्टार मिया खलिफा मात्र हमासच्या बाजूने उभे राहिल्या. इस्रायलनेच पॅलिस्टिनींचे दमन केले. त्यांचा छळ केला म्हणून हमास संघटनेने प्रतिकार करण्यासाठी इस्रायलवर हल्ला चढविला, असा दावा या तिघींनी केला. पण हमासच्या दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांची हत्या केली. महिलांवर बलात्कार केले त्यावर चकार शब्द उच्चारला नाही. आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर या तिन्ही अभिनेत्रींनी केवळ पॅलेस्टीनची बाजू घेऊन इस्रायल वरच हल्लाबोल केला आहे.
अशा स्वरूपाची प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटली. पाकिस्तानात सध्या अन्वर उल हक यांची हंगामी राजवट आहे. त्यांच्यापासून ते माजी पंतप्रधान इमरान खान आणि शहाबाज शरीफ यांनी देखील बाजू उचलून धरत इस्रायल वरच शरसंधान साधले. इस्रायलने पॉलिस्टिनींचा छळ केला नसता, त्यांची भूमी त्यांना परत केली असती, तर हमास संघटनेने हल्लेच केले नसते, असा दावा पाकिस्तान मधल्या नेत्यांनी केला आहे. पाकिस्तान मधले नेते आणि स्वरा भास्कर, गौहर खान मिया खलिफा यांच्यासारख्या अभिनेत्री एकाच भाषेत बोलत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more