Israel Hamas War : ‘इस्रायलने बॉम्बहल्ले थांवले नाही तर आम्ही ओलीस असलेल्यांना ठार करू’ हमासची IDFला धमकी

हमासच्या दहशतवाद्यांनी गाझामध्ये जवळपास 150 लोकांना ओलीस ठेवले आहे.

विशेष प्रतिनिधी

इस्रायल आणि हमास यांच्यात ७ ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. गाझापट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायल सातत्याने बॉम्बफेक करत आहे. तर हमासच्या म्हणण्यानुसार, बॉम्बहल्ल्यात गेल्या 24 तासांत परदेशी लोकांसह 13 ओलिस मारले गेले आहेत. Israel Hamas War We Will Kill Hostages If Israel Doesnt Stop Bombing Hamas Threatens IDF

एपी वृत्तसंस्थेनुसार, हमासने म्हटले आहे की, गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या जोरदार बॉम्बस्फोटामुळे परदेशींसह 13 ओलिसांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या लष्करी शाखेने सांगितले की, गेल्या 24 तासांत हे लोक विविध ठिकाणी मारले गेले. मात्र, या परदेशी नागरिकांचे राष्ट्रीयत्व अद्याप समजू शकलेले नाही. याला इस्रायलकडूनही दुजोरा मिळालेला नाही.

एएनआय या वृत्तसंस्थेने रॉयटर्सच्या हवाल्याने म्हटले आहे की, इस्रायली सैन्य गाझाला वेढा घालत आहे. इस्त्रायली लष्कराचे सैनिक सीमेवर रणगाड्यांसह तैनात आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हमासच्या दहशतवाद्यांनी गाझामध्ये जवळपास 150 लोकांना ओलीस ठेवले आहे. ओलिसांमध्ये वरिष्ठ इस्रायली लष्करी अधिकारी तसेच परदेशी नागरिकांचा समावेश आहे. इस्रायलने इशारा न देता गाझा पट्टीवर बॉम्बफेक सुरू ठेवल्यास ओलीसांना फाशी देण्याची धमकी हमासने दिली आहे.

Israel Hamas War We Will Kill Hostages If Israel Doesnt Stop Bombing Hamas Threatens IDF

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात