इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाता सात हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरू होऊन आता 19 दिवस होत आहेत. हल्ल्यातील मृतांची संख्या सात हजारांच्या पुढे गेली आहे. या युद्धावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. या युद्धाची संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) सातत्याने चर्चा होत आहे. मात्र, मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुरू असलेल्या चर्चेत काही वेगळेच घडले. चर्चेदरम्यान इस्रायलच्या राजदूताने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. Israel angry on UN secretary general for siding with Hamas
संयुक्त राष्ट्रातील इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी गुटेरेस यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आवाहन केले. एर्डन म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी लहान मुले, महिला आणि वृद्धांच्या सामूहिक हत्येबाबत दाखवलेली समज संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वासाठी योग्य नाही. मी त्यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी करतो. अशा लोकांशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, जे इस्रायल आणि यहूदी लोकांच्या विरोधातील सर्वात भयानक अत्याचारांबाबत संवेदना व्यक्त करतात, माझ्याकडे शब्दच नाहीत. तसेच, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी मंगळवारी केलेल्या भाषणात आक्षेपार्ह टिप्पण्यांबद्दल राजीनामा द्यावा.
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत गुटेरेस म्हणाले होते की हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे, की हमासने कोणतेही कारण नसताना हल्ले केले नसते. पॅलेस्टाईनचे लोक ५६ वर्षांपासून ताब्यात घेतलेल्या परिस्थितीचा सामना करत आहेत. तथापि, पॅलेस्टिनी लोकांच्या तक्रारी हमासच्या भयानक हल्ल्यांना योग्य ठरवूकरू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. त्याच वेळी, हे भयानक पॅलेस्टिनी हल्ले लोकांच्या सामूहिक शिक्षेला योग्य ठरवू शकत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App