Israel airstrike on Lebanon : इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला, 3 ठार; हिजबुल्ला कमांडरही ठार झाल्याचा दावा

Israel airstrike on Lebanon

वृत्तसंस्था

तेल अवीव : Israel airstrike on Lebanon :  गाझामध्ये (Gaza )गेल्या 10 महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलने(Israel )मंगळवारी लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हवाई हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 3 लोकांचा मृत्यू झाला, तर 74 लोक जखमी झाले. या हल्ल्यात इराण समर्थक दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा एक कमांडरही मारला गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. हज मोहसीन ऊर्फ ​​फुआद शुक्र असे मारल्या गेलेल्या कमांडरचे नाव आहे. इस्त्रायली लष्करानेही या हल्ल्याची पुष्टी केली असून त्यांनी बैरूतच्या दक्षिण उपनगरात एका दहशतवाद्याला लक्ष्य केले आहे.

खरं तर, शनिवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर गेल्या 10 महिन्यांतील सर्वात मोठा हल्ला केला. गोलन हाइट्सच्या फुटबॉल मैदानावर दहशतवादी संघटनेने लेबनॉनमधून रॉकेट डागले होते. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाले. याचा प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्कराने लेबनॉनमध्ये हवाई हल्ला केला आहे.



हमासनंतर इस्रायल हिजबुल्लाविरुद्ध युद्ध पुकारणार का?

हिजबुल्लाहच्या या हल्ल्यानंतर दोघांमधील संघर्षाचा धोका वाढला आहे. वास्तविक, इस्रायल आणि हिजबुल्ला काही काळापासून सतत एकमेकांवर हल्ले करत आहेत. ते लेबनॉनला अश्मयुगात पाठवू शकतात, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सांगितले.

दरम्यान, हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाह याने इस्रायलचे विमानतळ आणि सायप्रसवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. लेबनॉन-इस्रायल सीमेवर दोघांमधील वैर वाढत असल्याचे हिजबुल्लाचे उपप्रमुख शेख नईम कासिम यांनी म्हटले होते. जर इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये पोहोचले तर आम्ही त्याच्या सीमेवर नाश करू.

याआधी शनिवारी संध्याकाळी इस्रायली लष्कराने गाझा येथील एका शाळेवर हवाई हल्ला केला. किमान 30 पॅलेस्टिनी ठार तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुले आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

Israel airstrike on Lebanon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात