इस्लामीकरणाचा जगाला सर्वांत मोठा धोका; तालिबान कट्टर इस्लामच्या जागतिक कारस्थानाचा एक भाग; ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे परखड बोल

वृत्तसंस्था

लंडन – इस्लामीकरणाचा विद्यमान जगाला सर्वांत मोठा धोका आहे. तालिबान हा कट्टर इस्लामच्या जागतिक कारस्थानाचा एक भाग आहे, असे परखड बोल ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ऐकविले आहेत. अमेरिकन फौजा अफगाणिस्तानातली मोहीम अर्धवट सोडून माघारी गेल्या त्यावर देखील टोनी ब्लेअर यांनी बायडेन प्रशासनाचे कान टोचले. Islamism ‘first order security threat’, Taliban part of the global movement of radical Islam, says Tony Blair

इस्लामचे आणि कट्टर इस्लामचे संपूर्ण जगाचे इस्लामीकरण करणे हेच धोरण आहे. पण कट्टर इस्लामी विचारप्रणाली हिंसाचार करूनच संपूर्ण जगावर इस्लाम लादू इच्छितो. हा भयानक धोका जगाने ओळखला पाहिजे, असा इशारा टोनी ब्लेअर यांनी दिला. कट्टर इस्लामी विचारप्रणालीची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. रॉयल युनायटेड सर्विसेस इन्सिट्यूटमध्ये ते ९ – ११ स्मरणदिनानिमित्त बोलत होते.



इराण मधली शिया किंवा इतर देशांमधल्या इस्लामी सुन्नी राजवटी इस्लामीकरणालाच चिथावणी देतात. मग त्यांची विविध रूपे जगासमोर मुस्लीम ब्रदरहूड, अल कायदा, बोको हराम, आयएसआयएस या दहशतवादी संघटनांच्या रूपाने येतात. याच संघटनांनी संपूर्ण पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत कट्टल इस्लामवाद्यांचा धुमाकूळ घातला आहे, याकडे टोनी ब्लेअर यांनी लक्ष वेधले.

कट्टर इस्लामवादी राजवटी आणि जागतिक पातळीवरच्या कम्युनिस्ट राजवटी समान पध्दतीने वागतात. त्यांची ऑपरेशन्स समान असतात. आपली विचारप्रणाली सोडून इतर कोणतीही विचारप्रणाली त्यांना मोडूनच काढायची असते. कारण जगातल्या भिन्न भिन्न विचारप्रणाली कट्टर इस्लामला आणि कम्युनिस्टांना मान्यच नाहीत, असे टीकास्त्र देखील टोनी ब्लेअर यांनी सोडले

Islamism ‘first order security threat’, Taliban part of the global movement of radical Islam, says Tony Blair

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात