वृत्तसंस्था
तेहरान – इराणचे नवे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी निवडून येताच अमेरिकेवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध कसे राहणार याची नांदी झाली आहे. अमेरिकेने शांतता कराराचा भंग केला आहे आणि युरोपीय महासंघाने आम्हाला दिलेले आश्वायसन पाळलेले नाही, असा आरोप रईसी यांनी केला. Iran president raisi lashes on USA
इराणबरोबर २०१५ मध्ये झालेल्या शांतता कराराची पुन्हा अंमलबजावणी होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच रईसी यांनी हे आरोप केले आहेत. अमेरिका आणि युरोपीय महासंघाने करारावेळी दिलेली आश्वा सने पाळावीत आणि इराणवरील निर्बंध हटवावेत, अशी मागणी इराण सरकारने केली आहे.
अमेरिकेनेही इराणला इशारा देताना, शांतता चर्चा सफल होऊन कराराची अंमलबजावणी पुन्हा झाली तरी इराणच्या वर्तणुकीवरच कराराचे भवितव्य अवलंबून राहिली, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इराणमधील एकमेव अणुऊर्जा प्रकल्प अचानक बंद करण्यात आला आहे. या प्रकल्पातील अनेक भाग रशियाकडून पुरविण्यात आले होते आणि आता अमेरिकेचे निर्बंध असल्याने हे भाग खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प बंद करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App